स्कील इंडिया’च्या नावावर ९ हजार कोटींचा घोटाळा! बनावट लाभार्थी, खोटे प्रशिक्षण, चुकीची बँक खाती आणि बनावट भ्रमणध्वनी क्रमांक यांच्या आधारे ‘पीएमकेव्हीवाय’साठी निधी वितरित केल्याचे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘स्कील इंडिया’ अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत (PMKVY) ९ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ‘कॅग’ने ठेवला आहे.