वऱ्हाडी घेवून जाणाऱ्या बसला अपघात एकाचा घटनास्थळी मृत्यू, ४ गंभीर : गोंदिया कारंजा परिसरातील घटना

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनीश्वर):——————— मुलीच्या घरी लग्न समारंभ पार पाडून मोहाडीच्या दिशेने जाणाऱ्या वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सचा ओव्हरटेकच्या नादात अपघात झाला. या घटनेत एका वऱ्हाड्याचा घटनास्थळावर मृत्यू झाला. तर ४ वऱ्हाडी गंभीररीत्या जखमी झाले. ही घटना गोंदिया-गोरेगाव मार्गावरील कारंजा नजीक आज, १२ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली. मृताचे नाव सोनू घनशाम उईके (२७, रा. वाडी नागपूर) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव तालुक्यातील चोपा मोहाडी येथील वरखडे कुटुंबाने मध्यप्रदेशातील खैरलांजी नजीक असलेल्या माखेपार येथील मुलगी पसंत केली होती. ११ मार्च रोजी वऱ्हाडी अविनाश ट्रॅव्हल्स कंपनीच्या एमएच ०३, एन ९३५२ क्रमांकाच्या बसने माकेपार येथे लग्नाला गेले होते. लग्न आटोपून रात्रीच्या सुमारास ४५ वऱ्हाडी घेवून बस मोहाडीच्या दिशेने निघाली. पहाटेच्या सुमारास कारंजा नजीक ट्रॅव्हल्सच्या चालकाने टरबूज भरलेल्या मालवाहकाला ओव्हरटेक करत असताना ट्रॅव्हल्सने मालवाहकाला धडक दिली. यात ट्रॅव्हल्सवरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याखाली उतरली. घटनेनंतर मात्र भितीपोटी चालकाने खिडकीतून उडी मारून पळ काढला. घटना घडली तेव्हा बसमध्ये असलेले सर्व वऱ्हाडी साखरझोपेत होते. मात्र अपघात होताच वऱ्हाड्यांत एकच धावपळ माजली. काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत खिडकीतून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कारंजा येथील नागरिकांनी घटनास्थळ गाठून जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले. या घटनेत सोनू घनशाम उईके (२७, रा. वाडी नागपूर) या प्रवाशाचा मृत्यू झाला. तर ४ प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले. त्यात हेमराज चौहाण (५०, रा. कवळीटोला), शोभा उदल पंधरे (७०, रा. कोहमारा), नैतीक शाम सिडाम (१४, रा. कोहमारा) आणि लक्ष्मी घनशाम उईके (६५, रा. वाडी नागपूर) यांचा समावेश आहे. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास करत आहेत.

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली