गोंदिया(अनिल मुनीश्वर):——————————————————-
सध्याचे जग हे वैज्ञानिक असूनही अंधश्रद्धाच्या आहारी गेलेले दिसते. असेच वातावरण राहीले तर विज्ञान व तंत्रज्ञान यांचा उपयोग कसा होईल ही शंका येते,म्हणून लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभानी आपली भूमिका ही माणुसकीला तारणारी ठेवावी असे प्रतिपादन सन्मानार्थी डॉ. गजानन डोंगरवार यांनी केले. ते सत्कारमुर्ती म्हणून आपले मत व्यक्त केले.
यावेळी मंचावर महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा सल्लागार के. ए. रंगारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष सतीश कोसरकर, माजी सरपंचा कुंदा डोंगरवार, सहसचिव कुलदिप राठोड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर सन्मान सोहळा दि. ०३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता, कृषी उत्पन्न बाजार समिती, अर्जुनीमोरगाव येथील हॉलमध्ये संपन्न झाले. प्रसंगी मंचावरील सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष व या कार्यक्रमाचे आयोजक व निमंत्रक प्रा. मुन्नाभाई नंदागवळी यांनी या सन्मान सोहळ्याची भूमिका विषद करताना म्हणाले- डॉ. डोंगरवार हे रुजविणारे व्यक्तिमत्त्व आहे. ते सामाजिक सलोखा निर्माण करणारे माणुसकीचा धागा बांधणारे सभ्य मानव आहेत. योग्य माणसाची या सन्मानासाठी निवड केली असेही त्यांनी आपल्या प्रास्ताविका नमूद केले. पत्रकारांनी निपक्ष, निर्भीड व न्यायाची आपली चालवावी. तसेच कुंदा डोंगरवार, रंगारी यांनी सुध्दा आपले मनोगत मांडले.
डॉ. गजानन डोंगरवार यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा कार्याचा कर्तृत्ववाचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे संचालन लालचंद मारगाये केले तर आभार डॉ. किशोर पुस्तोडे यांनी मानले. तर यशस्वितेसाठी संजय बडोले, मोरेश्वर धारगावे, सरगम शहारे, सुरेश सुरेश खोब्रागडे, विनोद शहारे, बाबुलाल नेवारे, स्वप्नील उके, नितेश राऊत, अभिषेक पवार, श्री. सोनाग्रे,विश्वरत्न रामटेके, संतोष रोकडे यांनी परिश्रम घेतले.








