सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):————————==-======================= तालुक्यातील सौंदड येथील नागरिक गावाजवळील जंगलाच्या कडेवरील रोडला सकाळी मॉर्निंग वॉक करायला जातात.सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे जंगल परिसरात पाणी मिळेनासे होते.अशा परिस्थितीत जंगलातील पक्ष्यांना आपला जीव वाचवण्यासाठी दूरवर पाण्याच्या सोधात जावे लागते.या परिस्थीतीची जाणीव ठेवत सौंदड येथिल मॉर्निंग ग्रुपने जंगलातील पक्षांकरिता पाण्याची सोय केलेली आहे.यामध्ये लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष जगदीश लोहिया,सेवानिवृत्त प्राचार्य अनिल मेश्राम, गोपाल अग्रवाल,दिलीप राऊत,ज्ञानेश्वर शिवणकर,राजू सारंगपुरे, केवलचंद साखरे यांचा समावेश आहे.पर्यावरणाच्या हितासाठी याप्रकारे पुढाकार घेणे काळाची गरज आहे.या मॉर्निंग ग्रुपची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे.








