मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनीश्वर):—————————————————-/२८ मार्च
महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया जिल्ह्यातील घनदाट जंगल आणि नैसर्गिक डोंगररांगा यांच्या कुशीत वसलेले माँ मांडोबाई देवस्थान, बघेडा/टेढा येथे रामनवमीच्या पावन पर्वावर लक्ष्यापेक्षा अधिक १९१ सर्वजातीय नवदांपत्यांनी माँ मांडोदेवीचे आशीर्वाद घेऊन नवीन वैवाहिक जीवनाची सुरुवात केली. या वर्षी हजारो भक्तांच्या उपस्थितीत हा सामूहिक विवाह सोहळा भक्तांच्या प्रचंड उत्साहाने सफल पार पडला.

मांडोबाई देवस्थानातील हा सलग ३४वा सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळा असून तो २७ मार्च रोजी माँ मांडोबाईच्या कृपेने संपन्न झाला. नवदांपत्यांना आशीर्वाद देण्यासाठी राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन आणि कायदा-न्याय विभागाचे राज्यमंत्री अॅड. आशिष जायसवाल कुटुंबासह उपस्थित होते. त्याचप्रमाणे देवस्थानचे अध्यक्ष व गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल, आमगावचे आमदार संजय पुराम, माजी आमदार सहेसराम कोरोटे, हेमंतभाऊ पटले, खोमेशभाऊ रहांगडाले, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, पंस. गोंदिया सभापती मुनेश रहांगडाले, कृउबास सभापती भाऊराव ऊके, उषाताई मेंढे, सुरेंद्र नायडू, दीपाताई चंद्रिकापुरे, सविता अग्रवाल, चेतालीताई नागपुरे, सुमित भालोटिया, जीवनेश मिश्रा यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सामूहिक विवाह सोहळ्याबाबत देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा आमदार विनोद अग्रवाल म्हणाले की, सर्वजातीय सामूहिक विवाहाची सुरुवात १९९३ पासून याच देवस्थानातून झाली आहे आणि हा सलग ३४वा वर्ष आहे. आजच्या काळात हा उपक्रम समाजातील अनेक कुटुंबांचा वेळ आणि खर्च वाचवणारा प्रभावी उपक्रम ठरत आहे. दरवर्षी विवाहगटकांची वाढती संख्या ही आयोजन समितीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाची साक्ष आहे. आगामी काळात सर्व धर्मीय लोकांनी या उपक्रमांतर्गत विवाह नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्यमंत्री अॅड. आशिष जायसवाल यांनी माँ मांडोदेवीला नमन करून नवदांपत्यांना आशीर्वाद दिले. हजारो भक्तांच्या उपस्थितीने भारावून जाऊन त्यांनी सांगितले की, मुंबईत असताना मांडोदेवी देवस्थानाबद्दल जे ऐकले, ते आज प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य लाभले. “या पवित्र देवस्थानाच्या भव्य विकासासाठी मी कटिबद्ध आहे. लवकरच मी दिवसाच्या वेळी संपूर्ण क्षेत्राची पाहणी करणार असून येथे कोणते विकासकाम करता येईल याचा आढावा घेऊन निधी उपलब्ध करून देण्यात येईल,” असे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले, “मी त्या जिल्ह्याचा जावई आहे जिथे माँ मांडोदेवी विराजमान आहे, हा माझा सन्मान आहे. या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे ही माझी प्राथमिकता आहे.”

सामूहिक विवाहात नवदांपत्यांना लग्नासाठी आवश्यक जीवनोपयोगी वस्तू, वस्त्र, तसेच सोन्याचे मंगलसूत्र प्रदान करण्यात आले. मोठ्या संख्येने भक्त उपस्थित असल्यामुळे पोलिस प्रशासनाने मुंडीपार–हरदौली मार्ग तसेच मंदिर परिसरात उत्कृष्ट व्यवस्था राखली, याबद्दल आयोजन समितीने आभार मानले.

या संपूर्ण सोहळ्याला यशस्वी करण्यात देवस्थानाचे अध्यक्ष आमदार विनोद अग्रवाल, सचिव डॉ. लक्ष्मण भगत, उपाध्यक्ष भैयालाल सिंदराम, कोषाध्यक्ष विश्वनाथ असाटी, सहसचिव कुशनजी घासले, सदस्य डॉ. जितेंद्र मेंढे, शालिकराम उईके, सखाराम सिंदराम, दिलीप खंडेलवाल, राहुल अग्रवाल, नंदकिशोर गौतम, तसेच मंदिराचे पुजारी पंडित अयोध्यादास महाराज, किशोर शेंडे, अमोल भारती आणि बघेडा (टेढा) येथील ग्रामस्थांचे अनन्यसाधारण योगदान राहिले. मंगलाष्टक नारायण बहेकार यांनी केले, तर संचालन जगणेश गुरुजी यांनी केले.

एक नजर इथंही…

मध्य भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध धार्मिक पर्यटनस्थळ — सूर्यादेव मांडोबाई देवस्थान

दरवर्षी अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठी सूर्यादेव मांडोदेवी संस्थेला महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा फुले–शाहू–आंबेडकर पुरस्कार प्रदान झाला आहे. सर्वधर्म समभाव आणि मानवकल्याणाच्या ध्येयाने हे देवस्थान मध्य भारतातील प्रमुख धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.

दररोज हजारो भक्तांची उपस्थिती

मांडोदेवी देवस्थानात दररोज ३ ते ४ हजार भक्त दर्शनासाठी येतात. येथे ५० हून अधिक दुकाने आणि हॉटेल्स असल्याने या परिसराचे धार्मिक महत्त्व स्पष्ट होते.

हजारोंच्या संख्येने अंतरजातीय विवाह घडवणारी संस्था — मांडोबाई देवस्थान

प्रतिवर्ष आरोग्य शिबिर, मार्गदर्शन शिबिरे, तसेच नियमित विवाह सुविधा उपलब्ध असल्याने ही संस्था सामाजिक न्यायाची सशक्त उदाहरण ठरली आहे. आजपर्यंत हजारो विवाह, त्यातही मोठ्या प्रमाणावर अंतरजातीय विवाह येथे पार पडले आहेत. तसेच प्राचीन मांडोदेवी मंदिर भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे म्हणून प्रसिद्ध आहे.

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली