सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनीश्वर):—————————————————777
जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील नगरपंचायत महिला व बालकल्याण समितीच्या वतीने एकल महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व सक्षमीकरणासाठी स्वावलंबन कार्यशाळेचे आयोजन स्थानिक तेजस्विनी लॉन येथे सोमवारी (ता.30) आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यशाळेला एकल महिलांचा प्रतिसाद उत्स्फूर्त मिळाला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते 230 एकल महिलांना साडीचोळी चे वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपंचायतचे नगराध्यक्ष
तेजराम मडावी होते. यावेळी
मुख्य मार्गदर्शक म्हणून साऊ एकल महिला समितीचे जिल्हा संयोजक अनिल मेश्राम, उमेदचे
व्यवस्थापक अतुल मुटकरे,
हिंदूसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दीक्षा उपराडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नगरपंचायत च्या उपाध्यक्षा तथा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वंदनाताई डोंगरवार ,नगरसेविका शशिकला ताई टेंभूणे ,रिताताई लांजेवार, दीक्षाताई भगत,कामिनीताई कोवे,नगरसेवक देवचंद तरोणे, जयपाल रंगारी, अंकित भेंडारकर, नगरपंचायतचे मुख्याधिकारी सारंग खांडेकर,
कर व प्रशासन अधिकारी
युगलकुमार डडेमल, कर निर्धारण अधिकारी अनुपम वाघमारे,
कररचना विभागाच्या दीपाली धाडवड ,लेखापाल अनिल पवार,
साऊ एकल समितीच्या तालुका सचिव श्रीमती विमलताई पाखमोडे व पत्रकार अनिल मुनिश्वर, ओमप्रकाश टेंभुर्णे, आर. व्ही. मेश्राम,प्रा. राजकुमार भगत,बिरला गणविर, शाहिद पटेल,नीलेशकुमार शहारे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्य मार्गदर्शक जिल्हा समन्वयक अनिल मेश्राम यांनी शासन आपल्या दारी या संकल्पनेची शासनाच्या’ मिशन वात्सल्य’ समितीच्या बाबतीत विस्तृत माहिती देऊन एकल महिलांना मिळणाऱ्या शासनाच्या विविध योजनेच्या लाभाविषयी
विस्तृत माहिती दिली. एकल महिलांनी कोणावरही अवलंबुन न
राहता, स्वतःचा व्यवसाय उभारून स्वावलंबी बनावे .असे मार्गदर्शनात सांगितले. उमेदचे
अतुल मुटकरे यांनी महिलांना रोजगारा विषयी व विविध प्रशिक्षण बाबतीत मार्गदर्शन केले. डॉ. दीक्षा उपराडे व परीचारीका उषा जगताप यांनी महिलांच्या आरोग्या विषयी मार्गदर्शन केले.
मुख्याधिकारी सारंग खांडेकर यांनी नगरपंचायतच्या विविध योजना व लाभ याविषयीची माहिती दिली. तसेच नगरसेविका
रिता लांजेवार व नगरसेविका शशिकला टेंभुर्णे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपनगराध्यक्षा वंदना डोंगरवार यांनी केले.नगराध्यक्ष तेजराम मडावी यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की नगर पंचायत द्वारा एकल महिलांना मिळणारे लाभ देण्यासाठी प्राधान्य देणार, हेरंब कुलकर्णी सरांचे पत्र जिल्हा समन्वयक अनिल मेश्राम यांनी दिले .त्यामुळे आम्ही एकल महिलांसाठी कार्यशाळा घेतली.अनिल मेश्राम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली व महत्त्वाचे मार्गदर्शन केले. यासाठी त्यांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघराज कान्हेकर यांनी केले तर आभार श्रेयस राऊत यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल