IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई:(अनिल मुनीश्वर):_——————————————————
IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच 10 ज्येष्ठ अधिकाऱ्यांची बदली केल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठा फेरबदल करण्यात आला आहे. यामध्ये अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महापालिकांचे आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमधील नेतृत्वात मोठे बदल करण्यात आले आहेत.

*कोणाची कुठे झाली बदली? पहा सविस्तर यादी (IAS Transfer Maharashtra List)*

1. जी. श्रीकांत : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत असलेले जी. श्रीकांत यांची आता नवी मुंबईतील जल जीवन मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

2. दिलीप स्वामी : छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची बदली अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी झाली आहे.

3. वर्षा ठाकूर-घुगे : लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची मुंबईतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) सह मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.

4. दीपक सिंगला : पीएमआरडीए, पुणे येथील अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांची नागपूर येथील मनरेगा आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे.

5. के. मंजुलक्ष्मी : कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची पुणे येथील पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

6. डॉ. राजेंद्र भारूड : मुंबईतील उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रकल्प संचालक डॉ. राजेंद्र भारूड यांची कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे.

7. डॉ. प्रवीणकुमार देवरे : पुण्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची बुलढाणा जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.

8. डॉ. भरत बास्टेवाड : नागपूर येथील मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड यांची लातूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

9. वर्षा लड्डा : पुणे येथील कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वर्षा लड्डा यांची अमरावती महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
10. अमोल येडगे : कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्त पदी बदली झाली आहे.

11. डॉ. विजय राठोड : एमआयडीसी, मुंबईचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांची कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

12. . विनय गौडा जी.सी. : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची आता छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.

13. डॉ. किरण पाटील : बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

14. डॉ. मंगेश गोंदावले : एमआयडीसी, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांची गोंदियाच्या जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे.

15. कुमार आशीर्वाद : सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरच्या जिल्हाधिकारी पदी वर्णी लागली आहे.

16. वसुमना पंत : नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

17. प्रजित नायर : गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी बदली झाली आहे.

18. अंकित : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

19. कार्तिकेयन एस. : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.

20. संजीता महापात्रा : अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्रा यांची सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

21. मिन्नू पी. एम. : जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे.

22. सत्यम गांधी : सांगली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

23. जस्मिन : रत्नागिरीतील राजापूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी जस्मिन यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे.

24. अंजली शर्मा : अंजली शर्मा यांची जालना महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

25. कृष्णकांत कनवारिया : नंदुरबारमधील शहाद्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवारिया यांची जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली