सडकअर्जुनी(अनिल मुनीश्वर):—————————————————
तालुक्यातील माहुली(बिर्री) येथे शेतात दबा धरून बसलेल्या वाघाच्या हल्यात मृत्यू झालेल्या लक्ष्मीच्या कुटुंबाला वनविभागाकडून 25 लाखाची नुकसान भरपाई देण्यात आली.
सदर घटना 30 जानेवारी 2026 रोजी माहुली बिर्री येथे घडली मृत व्यक्तीचे नाव लक्ष्मी हेमराज सयाम वय 60 असून घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने आणि त्यांची टीम मौक्यावर पोहचली. यावेळी 50000 रुपयाची तत्काळ मदत देण्यात आली. वाघाला जेरबंद करण्यात आले.यानंतर वनविभाग कडून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.आज दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले ,वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने,माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश चुऱ्हे ,उषाताई मेश्राम सरपंच माहुली ,विशाल पर्वते उपसरपंच माहुली,पुष्पा कापगते पोलिस पाटील ,महेश मेश्राम ,सचिन कापगते, मुन्ना कापगते यांचे उपस्थितीत 24 लाख पन्नास हजार रुपयांचे धनादेश मृतक लक्ष्मी हेमराज सयाम चे कुटुंबीय हेमराज सयाम,भास्कर हेमराज सयाम,शामकला हेमराज सयाम यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन देण्यात आले.
सदरची नुकसान भरपाई कार्यवाही उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग, गोंदिया,सहाय्यक वनसंरक्षक रोहियो वन्यजीव सचिन डोंगरवार यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने यांचेकडून तत्परतेने करण्यात आली
.








