नेत्र तपासणी व करुणेचा सेवाभाव हाच आमचा ध्यास – इंजी. आनंद चंद्रिकापुरे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनीश्वर):———- ——सडक अर्जुनी तालुक्यातील जांभळी दोडके येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत नेत्र तपासणी मोतिया बिंदू शस्त्रक्रिया शिबिर व चष्मे वाटपाचा कार्यक्रम घेऊन समाजातील गरजू व वंचित घटकांना आरोग्यसेवा मिळावी, या उदात्त हेतूने नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातून सातत्याने कार्य केले जात असल्याचे प्रतिपादन इंजी. आनंद चंद्रिकापुरे यांनी केले. “करुणा आणि सेवाभाव या मूल्यांवर आधारित कार्यातूनच खऱ्या अर्थाने समाजपरिवर्तन साधता येते,” असे त्यांनी यावेळी नमूद केले.
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना नेत्ररोग तपासणी,सल्ला व आवश्यक त्या उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे उपक्रम राबवले जात आहेत. अनेक गरजू रुग्णांना मोफत तपासणी व मार्गदर्शन मिळाल्याने त्यांच्या जीवनात आशेचा नवा प्रकाश निर्माण झाला आहे.
नेत्र तपासणी कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. भुमेश्वर पटले जिल्हा परिषद सदस्य गोंदियायांच्या हस्ते चेतन वडगाये सभापती पंचायत समिती सडक अर्जुनी यांच्या अध्यक्षतेत, माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष इंजि. आनंद चंद्रिकापुरे, अनुराग सरोजकर, विजय सोनवणे, किशोर डोंगरवार, धम्मदीप साखरे विकी धपाडे, सचिन खोब्रागडे, मिथुन मेश्राम, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

चंद्रिकापुरे पुढे म्हणाले की या उपक्रमामुळे समाजातील दृष्टीदोषांकडे दुर्लक्ष न होता वेळेवर उपचार मिळत असून नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढत आहे. “गरजू प्रत्येक व्यक्तीपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे,” असे सांगत इंजी. चंद्रिकापुरे यांनी या सेवाकार्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

नेत्र तपासणीसारख्या उपक्रमांतून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
कार्यक्रमाचे आयोजन माऊली फाउंडेशन गोंदिया यांच्यावतीने करण्यात आले होते.

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें