ब्राह्मणकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गोंदिया तर्फे वडेगाव/सडक येथे 26 मार्च गुरुवारला भव्य मोफत आरोग्य महाशिबिर,

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनीश्वर):—————————————————— जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील वडेगाव/सडक (पटाची टोली) येथे गुरुवार, दिनांक 26 मार्च 2026 रोजी भव्य मोफत रोगनिदान व आरोग्य महाशिबिराचे आयोजन ब्राम्हणकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, गोंदिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आले असून, गरजू रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या महाशिबिरामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत) तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत विविध गंभीर आजारांची तपासणी व शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहे. यामध्ये स्तन कर्करोग, गर्भाशयासंबंधी आजार, पित्ताशय विकार, मूत्रपिंडातील खडे, प्रोस्टेट समस्या, अपेंडिक्स,हर्निया तसेच दंतविकारांवरील उपचारांचा समावेश आहे.

शिबिर सकाळी 9.00 ते दुपारी 12.00 राहणार असून नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच जुनी वैद्यकीय कागदपत्रे सोबत आणावीत,असे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार असून त्यामध्ये डॉ. नोव्हिल प्रभू ब्राम्हणकर (जनरल व लेप्रोस्कोपिक सर्जन), डॉ. प्रणय आकरे (जनरल फिजिशियन), मौसमी ब्राम्हणकर (आहारतज्ज्ञ), डॉ. गणेश्वरी ब्राम्हणकर (होमिओपॅथी तज्ज्ञ) तसेच डॉ. गौरी देवकाते (दंतचिकित्सक) यांचा समावेश आहे.

या सामाजिक उपक्रमासाठी निलेश चुटे (सचिव, झाडे कुणबी समाज, गोंदिया) यांचे विशेष सहकार्य लाभले असून आयोजन महेश मेंढे यांनी श्रीमद् भागवत राम मंदिर समिती वडेगाव/सडक येथे केले आहे.

“आपले आरोग्य हीच आमची प्राथमिकता आहे” या संदेशासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य महाशिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल