गोंदिया(अनिल मुनीश्वर):——————————————–=-========
गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पा जवळ गोटणगांव येथिल साईबाबा टेकडीवर मागील 63 वर्षापासून हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रीत येऊन साई उत्सव आणि हजरत खाँजा उस्मान हारूनी गणी खुरसानी व हजरत खाँजा बाबा यांचे संदल शरिफ (पुण्यतिथी) आयोजीत करून सामाजीक सलोखा व ऐक्याचे दर्शन घडवितात..
24 ते 26 मार्च दरम्यान हिंदू-मुस्लिम ऐक्याचे संगम समजल्या जाणान्या साईबाबा टेकडी, गोठणगांव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. असे येथिल आयोजक सैय्यद मुबारक खाँ साबरी, सैय्यद बिलाल साबरी यांनी सांगितले. व होणान्या कार्यक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रम 24 मार्च मंगळवारला रात्री 9.00 वाजता साई उत्सव (साईभजन) सुरू होईत्य 25 मार्च बुधवारला सकाकी 8.00 वाजता साईपालखी, गंगापुजन व गणेश पुजा साई टेकडी येथून गावात फेरी घालून भव्य मिरवणूक सकाळी 10.00 वाजता साई दरबार येथे पोहचणार व हवन पुजन सुरू होईल. साई महाप्रसाद 12.00 वाजता पासून ते 2.00 वाजे पर्यंत 3.00 वाजे परचंम कुशाई (झेंडावंदन) व हजरत सैय्यद शाहबद्दी साबरी रहेमतुल्ला अलै चादर चढविण्यात येईल. रात्री 8.00 वाजे पासून मिलाद महफिल व रात्री 10.00 वाजे पासून शम्मा महफिल (कव्वाली) आयोजन केले आहे.
26 मार्च गुरुवारला सकाळी 8.30 वाजता साई टेकडी गोठणगांव येथून गावात फेरी घालून भव्य मिरवणूक व संदल, हजरत खाजा उस्मान हारूनी गनी रहे. अलैह प्रतापगड मुबारक येथे पोहचणार आहे. त्यानंतर चादर चढविण्यात येईल.
*मा. ना. इंजि. राजकुमारजी बडोले साहेब, माजी मंत्री महाराष्ट्र शासन व आमदार अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्र, श्री. अनंगपालसिंह ठाकूर नागपूर, डॉ. हरिभाऊ कानडे नागपूर, श्री. कृष्णाजी कुंभारे वरूड अमरावती, श्री. शिवनारायणजी पालीवाल अर्जुनी मोरगांव, श्री. विलासजी ठाकरे नागपूर, श्री. योगेंद्र नारायण रायपुर, प्रशांतदादा शहारे सडक अर्जुनी, इशाकभाई गगन तिरोडा, मो. महताब मलिक राजनांदगांव, शोएब अशद कामठी, श्रीमती आम्रपाली डोंगरवार सभापती पंचायत समिती अर्जुनी मोरगांव, श्री. यशवंतजी गणवीर सदस्य जिल्हा परिषद गोंदिया, श्री. संजयजी ईश्वार, सरपंच ग्राम पंचायत गोठणगांव, श्री. कांतिलाल डोंगरवार गोठणगांव, श्री. रतिरामजी राणे गोठणगांव, श्री. प्रभुजी डांगे वडसा, खालीख पटेल लाखनी, गोपालजी ठाकरे गोरेगांव, बबलूभाई अन्सारी देवरी, श्री. कृष्णाभाऊ डोंगरे तिमेझरी, श्री. कपिलभाऊ पंचभाई आसलपाणी, श्री. कृष्णा टेंभरे भानपुर, शाहरुख कच्ची नागपूर, इमरानभाई पठाण साकोली, आबीद पठाण साकोली, मिथुनजी टेंभुर्णे गोठणगांव, अनवरजी शेख गोठणगांव यांची उपस्थिती राहणार आहे .*
दुपारी 1.00 वाजता ते सायंकाळी 7.00 वाजे पर्यंत आम लंगार (महाप्रसाद) चे आयोजन केले आहे









