गदिया(अनिल मुनीश्वर):————_———————————————————————— जिल्ह्यातील देवरी
शहरातील राष्ट्रीय महामार्गावर साकोली व लाखनी शहराच्या धर्तीवर भव्य सिंगल कॉलम (पिलर असलेला) उड्डाणपूल तयार करण्यात यावा, या मागणीसाठी देवरी शहरातील नागरिक आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार (२० मे 2026) रोजी देवरी कडकडीत बंद ठेवून भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले. या बंद दरम्यान शहरात शांततेत मोर्चा नगर पंचायत येथून हायवे रोड मार्गाने उपविभागीय कार्यालयावर गेला या ठिकानी देवरी चे उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले
या निवेदनात देवरी येथील राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांची सुरक्षा आणि शहराच्या भविष्याचा विचार करता ” पिलर कॉलम उड्डाणपूल” होणे अत्यंत गरजेचे आहे.सध्या महामार्ग प्राधिकरणा कडून प्रस्तावित असलेल्या किंवा तयार होत असलेल्या पारंपरिक भिंतीच्या पुलामुळे देवरी शहर दोन भागात विभागले जाण्याची शक्यता आहे. परिणामी स्थानिक व्यवसाय उद्ध्वस्त होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आम्हाला भिंत नको, तर पिलर असलेला उड्डान पूल हवा, अशी एकमुखी मागणीचा उल्लेख आहे.
साकोली व लाखनी येथे ज्याप्रमाणे आकर्षक आणि सुटसुटीत सिंगल कॉलम पूल उभारण्यात आले आहेत तसेच बांधकाम देवरीतही करण्यात यावे, अशी नागरिकांनी यावेळी मागणी केली. तहसील कार्यालयाच्या समोरील पूर्व भागातील नाल्यापासून ते थेट मोक्षधामजवळील पश्चिम भागातील नाल्यांपर्यंत हा उड्डाणपूल सलग बांधण्यात यावा. यामुळे शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी सुटेल आणि भविष्यातील अपघातांनाही आळा बसेल, असा विश्वास नागरिकांनी या प्रसंगी व्यक्त केला आहे.
या मोर्च्यात सर्व राजकिय पक्षाचे लोकप्रतिनीधी,पदाधिकारी,व कार्तकर्ते आणि सर्व समाजातील पदाधिकारी, सदस्यगण,तसेच शहरातील सर्व व्यवसाईक, नागरीक- महिला, षुरूष युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










