Edition

📅
-- --:--:--

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गोंदिया(अनिल मुनीश्वर):————-

____________________________ आज दि. 09.08.2026 रोजी कुणबी भवन, सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया येथे फॉरेस्टर अँड फॉरेस्ट गार्ड अससोसिएशन, ठाणा तथा महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना, नागपूर ची सभा पार पडली. सभेत हुतात्मा स्व.शामू शरणागत यांना दोन मिनिट मौन बाळगून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. व त्यांच्या पछयात त्यांच्या कुटुंबियांना कोणताही त्रास सहन न करता संघटनेने पुढाकार घेऊन सर्व लाभ मिळवून द्यावे असा निर्धार करण्यात आला.तसेच गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव – नागझिरा व्याघ्र राखिव क्षेत्र, गोंदिया मधिल विविध समस्या जाणून घेऊन, ज्या परिस्थितीत स्व. शामू शरणागत यांचा अस्वल वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला त्या परिस्थिती व कारणांचे जो पर्यंत संपूर्ण निवारण होत नाही. उदा. पुरेसे मनुष्यबळ, सुरक्षा उपकरण, वाहन व्यवस्था व इतर साधनसामुग्री पुरवठा होत नाही तो तोपर्यंत नवेगाव नागझिरा व्याघ्र राखिव क्षेत्र कोअर व बफर मधिल वनरक्षक वनपाल यांनी खालील बाबींवर बहिष्कार टाकावा असा एकमुखाने ठराव मंजूर करण्यात आला. एम स्ट्राईप गस्तवर बहिष्कार,कॅम्प मुक्काम वर बहिष्कार,सेल्फीवर बहिष्कार संघटनेच्या मागण्यांचे चे सविस्तर निवेदन तयार करून प्रशासनास लवकरच सादर करण्यात येईल. भविष्यात संघटनेच्या मागण्यांची दखल घेऊन तत्काळ उपाययोजना न झाल्यास आंदोलनाची तीव्रता टप्या टप्याने वाढविण्यात येईल असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सभेमध्ये महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र भदाणे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित वन कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित पदाधिकारी व कर्मचारी जिल्हाध्यक्ष दिनेश थेर, जिल्हा सचिव प्रशांत लाडे, दीनदयाल मेश्राम,प्रवीण केळवतकर, विवेक अवस्थी, नरेशकुमार पातोडे, मिनाक्षी बसीने, संजूषा पटले, विलास गौतम, दुर्गेश बागडे, चंद्रकांत गोदे, उमेश काळसर्पे, प्रमोद राऊत, राजेश डोंगरवार वैशाली मेहर, सुरेखा शिवणकर, हिना बागडकर, सीमा कापगते, कविता बिसेन, आरती बिसेन, वनिता ब्राह्मणकर, कार्यक्रमाचे संचालन व आभार अमित कुमार शहारे यांनी केले.•

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना

traffic tail