Edition

📅
-- --:--:--

सीईआयआर पोर्टलचा प्रभावी वापर; आठ हरविलेले मोबाईल परत नवेगावबांध पोलिसांची कामगिरी; १ लाख २० हजारांचा मुद्देमाल मूळधारकांच्या स्वाधीन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सीईआयआर पोर्टलचा प्रभावी वापर; आठ हरविलेले मोबाईल परत

नवेगावबांध पोलिसांची कामगिरी; १ लाख २० हजारांचा मुद्देमाल मूळधारकांच्या स्वाधीन

गोंदिया(अनिल मुनिश्वर), दि. २५ : हरविलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत मिळवून देण्यात नवेगावबांध पोलिसांना यश आले आहे. सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या माध्यमातून शोधून काढलेले आठ मोबाईल फोन शनिवारी (दि. २४) संबंधित मोबाईलधारकांच्या स्वाधीन करण्यात आले. या मोबाईलची एकूण अंदाजित किंमत एक लाख २० हजार रुपये आहे.

नवेगावबांध पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोबाईल सुपूर्द करण्याचा कार्यक्रम पार पडला. या वेळी हस्तगत करण्यात आलेले आठही मोबाईल त्यांच्या मूळधारकांना परत देण्यात आले.

हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी सीईआयआर पोर्टलचा प्रभावी वापर करण्यात आला. या तांत्रिक यंत्रणेच्या मदतीने मोबाईल शोधून संबंधित नागरिकांना परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलीस विभागाचे आभार मानले.

कार्यक्रमादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी तटकरे यांनी उपस्थित पोलीस पाटील, मोबाईलधारक आणि पोलीस अंमलदारांना मोबाईल वापरताना घ्यावयाची खबरदारी, सायबर सुरक्षेचे नियम तसेच आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याबाबत मार्गदर्शन केले. मोबाईलची सुरक्षितता राखण्यासोबतच सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमाला नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजित पाटील यांच्यासह पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. हरविलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत देण्याच्या या उपक्रमामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, पोलिसांच्या तांत्रिक तपास यंत्रणेच्या वापराचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

error: Content is protected !!