- ग्रामसेवकासह दोघे एक लाखांची लाच घेताना जाळ्यात!
माजी सैनिकाच्या शेती प्रस्तावासाठी ५.५० लाखांची मागणी; गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
गोंदिया | AGMNEWS24 प्रतिनिधी
गोंदिया जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी, १३ ऑक्टोबर रोजी मोठी कारवाई केली. माजी सैनिकाच्या पाच एकर शेती मिळविण्याच्या प्रस्तावासंदर्भात ग्रामपंचायतीचे ठराव आणि ना हरकत प्रमाणपत्राची (NOC) कागदपत्रे तयार करून देण्यासाठी एकूण ५ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी ग्रामसेवक महिलेसह तिच्या पतीला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. यापैकी एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारल्याचे तक्रारीच्या कारवाई अहवालातलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे ४८ वर्षीय माजी सैनिक आहेत. शासनाकडून पाच एकर शेती मिळविण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावासाठी ग्रामपंचायतीचे ठराव आणि ना हरकत प्रमाणपत्राची कागदपत्रे तयार करून देण्याच्या अनुषंगाने सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची नावे पुढे करून ५ लाख ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच काम सुरू करण्यासाठी स्वतःकरिता स्वतंत्र एक लाख रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.याप्रकरणी तक्रारदाराने ९ ऑक्टोबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने ९ ऑक्टोबर रोजी पंचांच्या उपस्थितीत आणि व्हॉइस रेकॉर्डरच्या मदतीने पडताळणी करण्यात आली. यावेळी संबंधित काम करून देण्यासाठी सरपंच व सदस्यांच्या नावाने ५ लाख ५० हजार रुपये आणि स्वतःकरिता स्वतंत्र एक लाख रुपये, अशी एकूण ६ लाख ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याचे अहवालात नमूद आहे. संबंधित रक्कम १२ किंवा १३ ऑक्टोबर रोजी गोंदिया येथील राहत्या घरी आणून देण्यास सांगितल्याचेही अहवालात म्हटले आहे.
१३ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. तक्रारदाराला पंच आणि व्हॉइस रेकॉर्डरसह संबंधितांच्या गोंदिया येथील निवासस्थानी पाठविण्यात आले. यावेळी आरोपी क्रमांक एक यांनी इशारा केल्यानंतर आरोपी क्रमांक दोन यांनी तक्रारदाराकडून एक लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. त्यानंतर पथकाने दोन्ही आरोपींना रंगेहात पकडून ताब्यात घेतले.
या प्रकरणातील आरोपी क्रमांक एक श्रीमती उषा जयकृष्ण पाटील (वय ४२), ग्रामसेवक, मानेगाव, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया, तर आरोपी क्रमांक दोन रमाकांत ग्यानीराम मोटघरे (वय ५४), विषय साधन व्यक्ती, गृह साधन केंद्र, पंचायत समिती सालेकसा, अशी नावे आहेत. दोघेही पती-पत्नी असून गोंदिया येथील राधाकृष्ण कॉलनी परिसरदोन्ही आरोपींविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८४४/२०२६ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील कलम ७ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अरविंद राऊत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, तसेच पोलीस कर्मचारी बोहरे, कहालकर, शेंडे, बोपचे, काटकर, सोनवणे, बाटबर्वे, पटले आणनागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दिंगबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.








