सौंदड येथे आज ५० फुटी रावणाचे दहन; दसरा उत्सवाचे आयोजन
जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते उद्घाटन; आमदार राजकुमार बडोले यांची अध्यक्षता
सडक अर्जुनी | AGMNEWS24 प्रतिनिधी
सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड (रेल्वे) येथे ग्रामपंचायत सौंदड आणि श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य ५० फुटी रावण दहन व दसरा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हिरवाजी देव परिसरातील भव्य खुल्या पटांगणात दुपारी ३ वाजता या सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते होणार आहे. अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
या सोहळ्याला भंडारा-गोंदिया विधान परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक
– दुपारी २ वाजता : शस्त्रपूजन व झाकी पटेल वॉर्ड परिसरात कार्यक्रम.– दुपारी ३ वाजता : हिरबाजी देव परिसर, सौंदड येथे पूजन.
– दुपारी ३.३० वाजता : मान्यवरांचा सत्कार व अमर फाउंडेशन, भंडारा यांच्याकडून रामायण लघुनाटिकेचे सादरीकरण.
– सायंकाळी ५.३० वाजता : भव्य आतषबाजीच्या गजरात ५० फुटी रावणाचे दहन.
या दसरा उत्सवाचा आनंद घेण्यासाठी सौंदड परिसरातील तसेच तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्सवाचे मुख्य आयोजक तथा सौंदडचे सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी यांनी केले आहे.








