Edition

📅
-- --:--:--

गरबा-दांडिया स्पर्धेचा प्रथम क्रमांक S.K दांडिया ग्रुप नागपूर ने पटकवीला. आमदार सांस्कृतिक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गरबा-दांडिया स्पर्धेचा प्रथम क्रमांक S.K दांडिया ग्रुप नागपूर ने पटकवीला.

आमदार सांस्कृतिक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

सडक अर्जुनी (निखिल मुनिश्वर) :

 

 नवरात्रोत्सवाच्या उत्साहाला सांस्कृतिक रंगांची उधळण देत आमदार सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित रास गरबा-दांडिया स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या स्पर्धा चे प्रथम पारितोषिक रोख 41 हजार रुपये व शिल्ड S.K.दांडिया ग्रुप नागपूर यांनी प्राप्त केले.द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख 31 हजार रुपये व शिल्ड S R. दांडिया ग्रुप गडचिरोली यांनी, तृतीय क्रमांक 21 हजार रुपये व शिल्ड H. D Boy’s ग्रुप चिमूर यांनी प्राप्त केले. चतुर्थ क्रमांक 11 हजार रुपये, राजप्रिय ग्रुप साकोली यांनी तर प्रोत्साहन पारितोषिक युनिक दांडिया ग्रुप सेंदूरवाफा, विन्स दांडिया ग्रुप अर्जुनी मोरगाव, आराध्य देवी दांडिया ग्रुप नागपूर, लावन्य दांडिया ग्रुप भंडारा यांनी प्राप्त केले असून मान्यवाराचे हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

 

 

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून तेजस्विनी लॉन समोरील प्रांगणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांनी उपस्थिती लावल्याने कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झाले.

 

या स्पर्धेत गोंदिया जिल्ह्यासह नागपूर, गडचिरोली, चिमूर आणि भंडारा येथील विविध चमूंनी सहभाग नोंदविला. सहभागी स्पर्धकांनी आपल्या उत्कृष्ट नृत्यकौशल्याने आणि आकर्षक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक चमूच्या सादरीकरणाला प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळत होती. पारंपरिक गरबा-दांडियाच्या माध्यमातून विविध भागांतील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.

बक्षीस वितरण सडक अर्जुनीचे नगराध्यक्ष तेजराम मडावी, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत शहारे, सडक अर्जुनी भाजप महिला अध्यक्ष शितलताई गौर, नगरसेवक महेंद्र वंजारी, हितेश डोंगरे ज्योतीताई जांभुळकर आदी मान्यवराच्या उपस्थित करण्यात आले.स्पर्धेचे परीक्षण प्रियांका कोरे आणि विक्की सय्याम यांनी केले.

 

आमदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक तसेच विविध जिल्ह्यांतील कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आमदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे पदाधिकारी तसेच निसर्ग फाउंडेशन, सडक अर्जुनीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

 

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

error: Content is protected !!