बीडटोला(निखिल अनिल मुनीश्वर):——————-
राज्य आणि देशाच्या प्रगतीसाठी खेळाच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळाडू घडविणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन इंजि. आनंद चंद्रिकापुरे (तालुका भाजपा सचिव, गोरेगाव) यांनी केले. स्थानिक क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया हे होते प्रामुख्याने उपस्थित इंजि. आनंद चंद्रिकापुरे सचिव तालुका भाजपा गोरेगाव, रचनाताई गहाणे जिल्हा परिषद सदस्य, इंजि सुनील तरोणे अध्यक्ष मराठा सेवा संघ गोंदिया, मिथुन मेश्राम जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गोंदिया,किशोर तरोणे माजी जिल्हा परिषद सदस्य गोंदिया, नितीन मेश्राम पोलीस पाटील बिडटोला, गुरुदेव चांदेवार माजी सरपंच कोहलगाव , कुंदन मेश्राम लिपिक वन विभाग नवेगाव बांध, संदीप तरोणे पोलिस पाटील, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांनी पुढे सांगितले की, खेळ केवळ मनोरंजन नसून तो व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी साधन आहे. खेळामुळे शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास वाढतो. ग्रामीण भागातील युवक-युवतींमध्ये मोठी क्षमता असून योग्य मार्गदर्शन, आधुनिक प्रशिक्षण आणि आवश्यक सुविधा दिल्यास ते राज्य व राष्ट्रीय स्तरावर नक्कीच चमकू शकतात.
इंजि. चंद्रिकापुरे यांनी पालकांनीही मुलांना शिक्षणासोबत खेळासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले. शासनाच्या विविध क्रीडा योजना, स्पर्धा आणि प्रशिक्षण शिबिरांचा लाभ घेऊन युवकांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात अनेक खेळाडूंना गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनीही खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
“उत्कृष्ट खेळाडू घडले तरच देशाचा क्रीडा क्षेत्रात मान उंचावेल,” असा विश्वास इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी सचिन खोब्रागडे, अजय मेश्राम, आशिष खोब्रागडे, अंशुल मेश्राम, आशिष मेश्राम, पुण्यशील मेश्राम प्रतिक चोहले, रत्नदिप मेश्राम इत्यादी सहारा क्रिकेट मंडळ बिडटोलाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.









