मांडोदेवी देवस्थान येथे ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन २७ मार्च रोजी.. रामनवमीच्या पावन पर्वावर १०० जोडप्यांची नोंदणी पूर्ण, १११ जोडप्यांना वैवाहिक जीवनात एकत्र बांधण्याचे लक्ष्य..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल गो.मुनीश्वर) :———————————————-**** श्री सूर्यदेव मांडोबाई देवस्थान समिती, बघेडा (तेढा) ता. आमगाव, जिल्हा गोंदिया यांच्या तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. २७ मार्च २०२६ रोजी रामनवमीच्या पावन निमित्ताने सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये १११ जोडप्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत १०० जोडप्यांची नोंदणी झाली असून, नवयुगल माता मांडोदेवीच्या आशिर्वादाने विनामूल्य विवाहबद्ध होतील.

संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले की, सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन १९९३ पासून सुरू असून, यंदा हा सलग ३४ वा वर्ष आहे. दरवर्षी वर–वधू दाम्पत्यांना विवाहानंतर आवश्यक जीवनावश्यक वस्तू, वस्त्र तसेच सोन्याचे मंगलसूत्र देण्यात येते. वेळ आणि पैशांची बचत लक्षात घेऊन या सामूहिक विवाह सोहळ्यात नोंदणी करून आपल्या परिवाराचा विवाह सूर्यदेव मांडोदेवी सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळ्यातच करून घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आमदार विनोद अग्रवाल, उपाध्यक्ष भैयालाल सिंदराम, सचिव डॉ. लक्ष्मण भगत, सहसचिव कुशन घासले, कोषाध्यक्ष विश्वनाथ असाटी, सदस्य डॉ. जितेंद्र मेंढे, शालिकराम उईके, सखाराम सिंदराम, दिलीप खंडेलवाल, राहुल अग्रवाल, नंदकिशोर गौतम तसेच मंदिराचे पुजारी पंडित अयोध्यादास जी महाराज यांनी केले आहे.

मध्य भारतातील सर्वाधिक चर्चित धार्मिक पर्यटन स्थळ — सूर्यदेव मांडोबाई देवस्थान..

दरवर्षी विविध धार्मिक व सामाजिक कार्यासाठी सूर्यदेव मांडोदेवी संस्थेला महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून ‘फुले-शाहू-आंबेडकर’ हा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला आहे. सर्वधर्म समभाव, मानवकल्याण व विश्वकल्याण ही सर्वोच्च भावना मनात ठेवून हे धार्मिक पर्यटन स्थळ मध्य भारतातील एक प्रमुख पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून विकसित झाले आहे.

मांडोदेवी देवस्थानात दररोज ३ ते ४ हजार भक्त व पर्यटक भेट देऊन माता मांडोदेवीचे दर्शन आणि आशीर्वाद घेतात. येथे नैसर्गिक सौंदर्याची रम्य दरी खुले डोळ्यांनी पाहण्यास मिळते. भाविकांसाठी ५० हून अधिक दुकाने आणि हॉटेल्सची सुविधा उपलब्ध आहे. दरवर्षी आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य सेवा व इतर मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जाते, त्यामुळे संस्था सामाजिक स्तरावर चर्चेत असते. येथे रोज विवाहसोय उपलब्ध असून, आजवर हजारो विवाह तसेच हजारोंहून अधिक अंतरजातीय विवाह सोहळे संपन्न झाले आहेत, ज्यातून संस्थेची सामाजिक न्यायावरील बांधिलकी दिसून येते. तसेच प्रत्येक वर्षी विविध उत्सवांसह भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या मांडोदेवी मातांचे हे प्राचीन मंदिर विशेष प्रसिद्ध आहे.

विवाह नोंदणीसाठी अधिक माहितीसाठी किशोर शेंडे (७८८७६९१५०४), अमोल भारती (९२८४४३७१५७) यांच्याशी संपर्क साधावा.

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली