डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारणे काळाची गरज-डॉ. सुगत चंद्रिकापुरे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(अनिल मुनिश्वर): ———————————–

देशातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचे काम बाबासाहेब आंबेडकरांनी केल. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात समानतेचा नियम आहे. न्याय, स्वातंत्र, समता या प्रमुख घटकांच्या समावेश भारतीय संविधानात आहे. ज्या महामानवाने या देशाची राज्यघटना लिहून समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने अशा महामानवाच्या आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे.भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान म्हणून ओळखले जाते . त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारणे ही काळाची गरज आहे.असे प्रतिपादन डॉ. सुगतदादा चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले. जनसंपर्क कार्यालय एरिया 51 कोहमारा येथे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे ते म्हणाले सातत्याने अन्यायाविरुद्ध लढण्याचे काम बाबासाहेबांनी केले. बाबासाहेबांचे कार्य शब्दात व्यक्त करता येणार नाही. त्यांनी देशासाठी मोलाचे योगदान दिले. परंतु आज खऱ्या अर्थाने अवस्था फार बिकट झाली आहे. अनेक जण शिक्षण घेतात ,स्वार्थासाठी संघटित होतात. मात्र ही अवस्था खऱ्या अर्थाने बदलली पाहिजे. इथला प्रत्येक व्यक्ती आचाराने आणि विचाराने सुद्ध राहिला पाहिजे .असे ते म्हणाले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने गिरीपाल फुले, गोवर्धन खोब्रागडे, उमराव मांढरे, भागवत झिंगरे, ओमराज दखणे, सिंधुताई बारसागडे, मधु हर्षे, अजय सूर्यवंशी, तेजराम चुटे, परमानंद कोवे, सौरभ सोनवाणे, बिरला गणवीर, प्रल्हाद बावनकुळे, आशिष लंजे, प्रवीण अंबादे, प्रल्हाद बावनकुळे, यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बिर्ला गणवीर यांनी केले. तर आभार सचिन रामटेके यांनी मानले.

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली