गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांकरिता सिटीझन फिडबॅक प्रणाली कार्यान्वित पोलीस अधीक्षक गोरख भामरे,(भापोसे) यांनी नागरिकांचे सुविधे करिता सुरु केलेला आणखी एक नविन स्तुत्य उपक्रम.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया (अनिल मुनिश्वर)
———————————–
गोंदिया जिल्हयातील नागरिकांना पोलीस विभागाशी संबंधित विविध कामांकरिता जिल्हयातील पोलीस स्टेशन, जिल्हा वाहतुक शाखा, भरोसा सेल, सायबर सेल व ईतर शाखांमध्ये जावे लागते..

पोलीस स्टेशन किंवा ईतर शाखांमध्ये तक्रार करणे करिता किंवा ईतर पोलीस विभागाशी संबंधित कामा निमित्त गेल्यानंतर त्यांची तक्रार नोंदविली गेली किंवा नाही… तसेच संबंधित पोलीस स्टेशन किंवा शााखा येथे त्यांना आलेल्या अनुभवा संबंधी फिडबॅक नागरिकांना याप्रणाली मार्फत देता येणार आहे… व त्यांनी दिलेल्या फिडबॅकचे मुल्यांकन उपविभागीय पोलीस अधिकारी, अपर पोलीस अधिक्षक व स्वतः मा. पोलीस अधिक्षक करणार आहेत…याद्वारे नागरिकांना जलद व चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळतील हे निश्चित केले जाणार आहे.

सदर प्रणाली करिता प्रत्येक पोलीस स्टेशन व शाखांमध्ये क्यु.आर. कोड असलेले बॅनर दर्शनी भागात लावण्यात आलेले आहेत.. यावरील क्यु. आर. कोड नागरिक आपले मोबाईलद्वारे स्कॅन करुन आपला फिडबॅक व पोलीस विभागातील कामासंबंधी आपला अभिप्राय नोंदवू शकतात. सदर फिडबॅक प्रणाली मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेत उपलब्ध असुन सर्वसामान्य नागरिकांना समजेल अशा सोप्या पदधतीने तयार करण्यात आलेली आहे.

तरी नागरिकांनी सदर फिडबॅक सिस्टमचा जास्तीत जास्त उपयोग करुन पोलीस विभागातील त्यांचे कामासंबंधी आपला अनुभव तसेच अभिप्राय देवुन सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात येत आहे.

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल