द बर्निंग कार..शिरपूर नाक्यावर धावत्या कारचा भडका,कार जळून खाक; सुदैवाने जीवित हानी नाही; देवरी पोलीस हद्दीतील घटना.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनिश्वर)
—————————-
ता.१७:गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील शिरपूर/बांध येथील सीमा तपासणी नाक्यावर गुरुवार (ता.१० एप्रील ) रोजी पहाटे ५:१५ वाजेच्या सुमारास द बर्निंग कारचा थरार गावकऱ्यांनी अनुभवला. नागपूर वरून झारखंड ला जातांना अचानक कार पेटल्याने मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले मात्र तो पर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरील देवरी पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम शिरपूर/बांध येथे असलेल्या सीमा तपासणी नाक्यावर आज पहाटे पाच व्यक्ती आपल्या डस्टर गाडीने नागपूर वरून झारखंडला काही कामानिमित्त जात असताना, शॉर्ट सर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत कार जळून खाक झाली. मात्र जीवित हानी टळली.
या घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी धावले मात्र आगीचा मोठा भडका असल्यामुळे कोणीही जवळ जाऊ शकले नाही. गावकऱ्यांनी तातडीने अग्नीशमन दलाला माहिती दिली. अवघ्या काही मिनीटातच अग्रीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले मात्र तो पर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली. यामध्ये सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.#
(टिप :- या बातमी सोबत जळत असलेल्या कार ची फोटो पाठविली आहे.)

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल