
गोंदिया (अनिल मुनीश्वर ):-
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त तसेच कृषी दिनाच्या औचित्याने आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात ग्रामपंचायत डव्वा, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया येथील सरपंच योगेश्वरी सी. चौधरी यांना “वसंतराव नाईक पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले.
या पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह (ट्रॉफी), शाल, श्रीफळ आणि रु. ३५,०००/- रोख रक्कम प्रदान करण्यात आली.
हा पुरस्कार गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री मा. इंद्रनील नाईक, उद्योगमंत्री मा. उदय सामंत, पर्यटनमंत्री मा. शंभूराज देसाई तसेच मान्यवर माजी मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी सरपंच योगेश्वरी सी. चौधरी यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य डिलेश्वरी कुरसुंगे, एकनाथ गायधने तसेच ग्रामपंचायत कर्मचारी फिरोज पठाण यांनी पुरस्कार स्वीकारला.
या सन्मानामुळे ग्रामपंचायत डव्वा तसेच गोंदिया जिल्ह्याचा गौरव वाढला असून परिसरातून सरपंच योगेश्वरी चौधरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










