Edition

📅
-- --:--:--

कमलेश सोनटक्के डुग्गीपार(सडक अर्जुनी)चे नवे ठाणेदार 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सडकअर्जुनी(निखिल मुनीश्वर):-

गोंदिया जिल्ह्यातील पोलीस विभागात प्रशासकीय बदल करत पोलीस अधीक्षक गोरख भांबरे यांनी ठाणेदारांच्या बदल्यांचे आदेश जारी करत आदेशानुसार अर्जुनी मोरगाव चे ठाणेदार कमलेश सोनटक्के यांची दुग्गीपार (सडक अर्जुनी)पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचे तालुका पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनीश्वर व इतर पत्रकार उपस्थित होते

दुग्गीपार पोलीस स्टेशनचे विद्यमान ठाणेदार गणेश वनारे यांची बदली देवरी पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे,पोलीस अधीक्षक गोरख भांबरे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था प्रभावी करण्यासाठी तसेच प्रशासकीय गरज लक्षात घेऊन या बदल्या केल्याचे सांगितले जात आहे नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के हे शिस्तबद्ध कामकाज गुन्हेगारीवर आळा घालणे आणि नागरिकांशी समन्वय राखण्याच्या कार्यशैलीमुळे परिचित आहेत,

डुग्गीपार पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी धाड टाकून अवैध दारू साठा जप्त केला आहे,हे विशेष.

कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करणे गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे तसेच नागरिकाभिमुख पोलीस व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर त्यांचा भर राहावा अशी अपेक्षा पत्रकारांनी व्यक्त केली आहे

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना

traffic tail