गोंदिया(अनिल मुनीश्वर);——————-
समाजातील गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदानासारखे पवित्र कार्य दुसरे कोणतेही नाही, असे प्रतिपादन आनंद चंद्रिकापुरे यांनी केले.
ग्रामपंचायत कार्यालय नळेगाव बांध येथे रक्तदान शिबिराच्या प्रसंगी ते बोलत होते. “रक्तदानामुळे केवळ एका व्यक्तीचे नव्हे, तर अनेक कुटुंबांचे आयुष्य सुरक्षित होते,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्याची नितांत गरज असून रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून मानवतेचे खरे दर्शन घडते. तरुणांनी पुढे येऊन नियमित रक्तदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वेच्छेने रक्तदान केले. अशा उपक्रमांमुळे समाजात एकोप्याची भावना वृद्धिंगत होत असून गरजू रुग्णांना जीवनदान मिळत आहे.
“रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि ते प्रत्येक सक्षम व्यक्तीने करावे,” असे सांगत आनंद चंद्रिकापुरे यांनी आयोजक व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानले. नवेगाव बांध येथील ग्रामपंचायत कार्यालय येथील आयोजित केले होते यात ३० रक्तदात्यानी रक्त दान केले. माऊली फाउंडेशन चे अध्यक्ष इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन माऊली फाउंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आले होते.







