वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार,सडक अर्जुनी तालुक्यातील माहुली येथील घटना

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनीश्वर):———–::::::::
शेतात काम करत असलेल्या महिलेवर वाघाने अचानक हल्ला केला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सडक अर्जुनी तालुक्यातील माहुली शेतशिवारात शुक्रवार 30 जानेवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. लक्ष्मीबाई हेमराज सय्याम (55) रा. माहुली असे मृताचे नाव आहे. शांत आणि कष्टकरी म्हणून परिचित असलेल्या लक्ष्मीबाई यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे व शोककळेचे वातावरण पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मीबाई नेहमीप्रमाणे मक्याच्या शेतात काम करत असताना झुडपांमधून दबा धरून आलेल्या वाघाने मागून झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शेजारील शेतातील शेतकरी, मजूर महिला,गावकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच सडक अर्जुनी वनविभागाचे वनपरिक्षेत्रअधिकारी मिथुन तरोने व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तातडीची मदत म्हणून पन्नास हजार रुपये शासना तर्फे देण्यात आले.

Oplus_16908288
.परिसरात वाघाचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून, तत्काळ पिंजरा लावून वाघाला जेरबंद करण्याची मागणी होत आहे. घटनेमुळे माहुली व परिसरातील शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून,मानवी जीवाला धोका निर्माण होत असताना वनविभागाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

घटनास्थळावर वाघाचे पगमार्क आढळले. घटनास्थळी चिखल असल्याने पगमार्क स्पष्ट दिसून येत नाही. काही प्रत्यक्षदर्शीनी वाघाला पाहिल्याचे सांगीतले जाते. घटनास्थळावर ट्रॅप कॅमेरे बसविण्यात येत आहेत. हल्ला करणारा वाघ कोणता आहे. याची सहनिशा करून तसा अहवाल वरीष्ठांना पाठविण्यात येईल.
– पवन जोंग
उपवनसंरक्षक, गोंदिया

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली