गोंदिया रेल्वे स्थानकावरील अमृत भारत योजनेच्या कामांची मा.खा.सुनिल मेंढे यांच्याकडून पाहणी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनीश्वर):___________________ केंद्र शासनाच्या अमृत भारत योजने अंतर्गत गोंदिया रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या सौंदर्यीकरण व प्रवासी सुविधा विकास कामांची माजी खासदार श्री. सुनील मेंढे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
स्थानक परिसरातील बांधकामांची गुणवत्ता, कामांचा वेग व वेळेत पूर्णता यावर विशेष भर देत संबंधित अधिकाऱ्यांना कामे ठरलेल्या वेळेत उच्च दर्जासह पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रवाशांना अधिक आधुनिक व सुसज्ज सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी काही रचनात्मक सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या. तसेच स्टेशन मास्टरकडून विविध व्यवस्थांची माहिती घेत रेल्वे प्रवाशांच्या अडचणींबाबतही चर्चा करण्यात आली.
गोंदिया शहरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या आवागमन समस्येचा विचार करून फुट ओव्हर ब्रिजच्या कामाची विशेष पाहणी करण्यात आली. येत्या एप्रिल महिन्यापर्यंत हा पूल पूर्ण होऊन नागरिकांसाठी खुला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे स्थानिकांच्या दैनंदिन ये-जा सुलभ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना श्री. मेंढे यांनी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचे अभूतपूर्व आधुनिकीकरण होत असल्याचे सांगितले. वंदे भारतसारख्या आधुनिक गाड्यांपासून ते अमृत स्टेशन योजनेपर्यंत देशभरात रेल्वे क्षेत्रात मोठे परिवर्तन घडत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. रेल्वे मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली ही विकासकामे गोंदिया शहराच्या प्रगतीस नवी दिशा देणारी ठरणार असून नागरिकांसाठी अभिमानाचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले.

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें