मुख्य बस स्थानकावर बस थांबवूनही थांबत नाही,बस चालक वाहकांच्या अरेरावीपणा मुळे प्रवासी त्रस्त,आगार प्रमुखांनी लक्ष घालण्याची गरज

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनीश्वर):_—————— जिल्ह्यातील सडक अर्जुनी शहरातील शिव मंदिर परिसरात प्रवाशांच्या सेवेसाठी मुख्य बस स्थानक फार पूर्वीपासून असून या ठिकाणी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहक यांच्या अरेरावी पणामुळे हात दाखवूनही बस थांबत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या बसस्थानकातून दररोज शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच इतर प्रवासी तालुक्याच्या विविध कामानिमित्त येत असतात त्यांना विविध ठिकाणी तसेच पुढील प्रवासासाठी हे बस स्थानक सोयीचे असल्याने या ठिकाणी थांबलेले असतात प्रवाशांना अर्जंट गणतव्य स्थळी जायचे असते परंतु काही हेकेखोर चालक वाहका मुळे त्यांना वेळेवर पोहोचता येत नसल्याने त्यांचा मनस्ताप होऊन ते कोणत्याही मार्गाने बस थांबविण्याचा प्रयत्न करत असतात वेळप्रसंगी काही विद्यार्थी तर हाती दगड घेऊनच उभे असतात अशात काही अनुचित घडल्यास याला जबाबदार एसटी महामंडळाचे चालक वाहक असतील…?
असाच एक प्रकार सडक अर्जुनी येथील परिचारिका उषा जगताप यांच्याशी 16 जानेवारीला त्यांना नागपूरला जाण्याकरिता या मुख्य व स्थानकावर थांबून दोन तास लोटल्यावरही बस थांबली नाही परिणामी त्यांना त्यांचे भाऊ संजय जगताप यांच्या मदतीने कोहमाऱ्या पर्यंत जावे लागले त्या ठिकाणी शिवशाही बस थांबली त्यात त्यांना पायाला त्रास असल्यामुळे सामान घेऊन कसेतरी चढावे लागले आणि कंडक्टर सीटवर त्या जाऊन बसल्या त्यामुळे त्या लेडीज वाहकाने त्यांच्यासोबत अरेरावी करत त्यांच्याशी अभद्र व्यवहार केला व त्या सीट वरून त्यांना उठविले त्यांच्यासोबत त्यांना तिकीट देऊनही नागपूरपर्यंत भांडत करत गेल्या भांडण इतके विकोपाला गेले की त्या लेडी वाहकाने तिकीट कापण्याची मशीनच उषा जगताप यांच्या गळ्यात टाकली आणि तूच वाहक बन मी मागे जाऊन बसतो म्हणत खूप वाद घातला या वादात एका सभ्य प्रवाशाने जगताप यांना सीट देऊन बसायला सांगितले त्यामुळे उषा जगताप यांना शेवटी डूग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी लागली असून त्यांना न्यायाची प्रतीक्षा आहे
येथील मुख्य व स्थानकावर काही बोटावर मोजण्या इतके चालक आपल्या मन मर्जीने बस थांबवत नाही अशा चालकांना “लातो के भूत बातो से नही मानते”या मनीप्रमाणे समज देण्याचा मानस येथील प्रवाशांनी बनविला आहे काही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार संबंधित प्रशासन राहील याबाबत निवेदनही देण्यात आलेले आहे

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली