एसीबी ची कारवाई सहाय्यक महसूल अधिकारी 1500 रुपयाची लाच घेताना अटक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनीश्वर):——————-देवरी तहसील कार्यालय तील सहायक महसूल अधिकाऱ्याला गोंदिया एसीबीच्या टीमने पंधराशे रुपयाची लाज घेताना अटक केली आहे हे कार्यवाही 13 फेब्रुवारी 2026 रोजी केली अटक झालेल्या आरोपीचे नाव सहाय्यक महसूल अधिकारी संदेश बोरकर असे आहे. तक्रारदार हे 49 वर्षाचे असून सरकारतर्फे
फिर्यादी उमाकांत उगले, पोलीस निरीक्षक, लाप्रवी हे आहेत तर आरोपीचे नाव संदेश नैनदास बोरकर वय 39 वर्ष पद सहायक महसूल अधिकारी प्रस्तुतकार 01, तहसील कार्यालय देवरी तालुका देवरी जिल्हा गोंदिया (वर्ग 3) असे आहे

प्रकरण अशा प्रकारे आहे की, तक्रारदार राहत असलेल्या देवरी येथील सर्वे नंबर 309/ 1/ ब मधील सोसायटी मध्ये ओपन स्पेस असून सदर ओपन स्पेसवर, सार्वजनिक गणेश व साई बहुउद्देशीय संस्था देवरी यांनी अवैद्य बांधकाम केले असून सदर बांधकामावर कारवाई करून काढण्यासाठी तक्रारदार व इतर लोकांनी नगरपंचायत देवरी, मंडळ अधिकारी यांना पत्रव्यवहार करून सुद्धा कायदेशीर कारवाई न झाल्यामुळे, तक्रारदार व इतर लोकांनी मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे रिट पिटीशन दाखल केले होते. सदर रिट पिटीशन मध्ये माननीय न्यायालयाने योग्य कार्यवाही करणे बाबत मुख्य अधिकारी नगरपंचायत देवरी यांना आदेश दिले होते. सदर आदेशाच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी उपविभागीय अधिकारी देवरी यांना पत्र लिहून माननीय न्यायालयाच्या आदेशान्वये कारवाई करण्याबाबत पत्र दिले असता, उपविभागीय अधिकारी देवरी यांनी तहसीलदार देवरी यांना सदर प्रकरणात सविस्तर चौकशी/ तपासणी करून आवेदकास परस्पर कळविण्याबाबत व वस्तुनिष्ठ अनुपालन अहवाल सादर करण्याबाबत होते. दिनांक 12.फेब्रुवारी.2026 रोजी तक्रारदार हे तहसील कार्यालय देवरी येथे सादर अर्ज बाबत चौकशी करण्यासाठी गेले असता तेथील लिपिक श्री बोरकर यांना भेटून, अर्ज चौकशी अहवाल तयार झाला किंवा नाही याबाबत विचारणा केली असता त्यांनी तुमच्या बाजूने अहवाल तयार करून देण्यासाठी 2000/-रुपये द्यावे लागतील असे सांगितले. तसेच 13. फेब्रुवारी 2026 रोजी आलोसे श्री बोरकर यांनी तक्रारदार यांना फोन करून बोलाऊन सायंकाळी 2000 रुपये घेऊन या असे सांगितले. तक्रारदार यांना ती लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक 13.फेब्रुवारी 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे येऊन आलोसे यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली होती.सदर तक्रारीवरून दिनांक 13. फेब्रुवारी 2026 रोजी सापळा अधिकारी यांनी दोन पंचासह देवरी येथे जाऊन तक्रारदार यांना पंचासह तहसील कार्यालय देवरी येथे आलोसे यांचेकडे पाठवून लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता, आलोसे यांनी तक्रारदार यांचे बाजूने अहवाल तयार करून पाठवण्यासाठी तडजोडी अंती 1500/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे.
दिनांक 13.फेब्रुवारी . 2026 रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून तक्रारदार यांचे बाजूने चौकशी अहवाल तयार करून पाठवण्यासाठी तक्रारदार यांचे कडून 1500/ रुपये लाच रक्कम स्वीकारून गैरफायदा घेतला आहे.
आरोपीच्या अंगझडतीत 1000/रुपये मिळून आले ते त्यांना वेळीच परत करण्यात आले आहेत. आरोपी यांच्या ताब्यात poco कंपनीचा किमती 5000 रु. चा 1 मोबाईल, 1500/- रुपये लाच रक्कम, गुण्यासंदर्भाने कागदपत्र, आरोपी सोबत व्हाट्सअप वरून केलेली चॅटिंगची स्क्रीन शॉट, ताब्यात घेण्यात आला आहे. बातमी ली पर्यंत आरोपीची घर झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून
रजिस्टर न, कलम पोस्टे. देवरी जिल्हा गोंदिया येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें