छत्रपती शिवाजी संकुल देवरी येथे छत्रपती शिवजयंती सोहळा 19 फेब्रुवारी गुरुवारला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):————-कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था देवरी द्वारा संचालित ”छत्रपती शिवाजी संकुल देवरी” येथे दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ गुरुवार रोजी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
दरवर्षी प्रमाणे या जयंती सोहळ्यानिमित्त दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ ला सकाळी ११:०० ते सायं. ४:०० वाजेपर्यंत एकाच सत्रात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार अशोक नेते,गडचिरोली/चिमूर लोकसभा क्षेत्र यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कार्यक्रमाचे पूजन व ध्वजारोहण आ.संजय पुराम, आमदार देवरी / आमगाव विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते तसेच याप्रसंगी आमंत्रित प्रमुख वक्ते व मार्गदर्शक डॉ. अशोक बांगर (शिवचरित्रकार, बीड), प्रजित नायर, जिल्हाधिकारी, गोंदिया, गोरख भामरे, पोलिस अधिक्षक, गोंदिया, संजय ऊईके, नगराध्यक्ष, न.पं. देवरी व झामसिंगजी येरणे, अध्यक्ष, कृ.स.तं.शि.सं., देवरी या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी वीरेंद्रजी अंजनकर, संपर्क प्रमुख, भाजपा, गोंदिया-भंडारा जिल्हा, प्रा. डाॅ. किर्ती लड्डा, माजी प्राध्यापक, औषधविज्ञान आणि तंत्रज्ञान आयसीटी, मुंबई, मा. अध्यक्ष व सचिव, ताप्ती सेवा समिती व लायन्स क्लब, गोंदिया व चंद्रशेखर लंजे, प्रगत शेतकरी, सिंदीपार या सत्कारमूर्ती व्यक्तींचे व संस्थेचे स्वागत व सत्कार होणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी संकुलमध्ये शिक्षण घेत असलेल्या छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर, सी. एस. इंग्लिश पब्लिक स्कूल, संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या दोन्ही आश्रमशाळा, सी. एस. आयुर्वेदीक काॅलेज अँड हॉस्पिटल व सी. एस. नर्सिंग काॅलेज या विभागातील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दरवर्षी प्रमाणे इयत्ता दहावी व बारावी महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या परीक्षेमध्ये व CBSE दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पालकासह स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे.
मागील २७ वर्षापासुन छत्रपती शिवाजी संकुल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा केला जातो. या उत्सव सोहळ्यामध्ये देवरी तालुक्यातील पत्रकार संघ व इलेक्ट्रॉनिक मीडिया चे पदाधिकारी व जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन हे कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन अनिलकुमारजी येरणे, सचिव, कृ.स.तं.शि.सं., देवरी छत्रपती शिवाजी संकुल उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली