गोंदिया(अनिल मुनीश्वर):—————— ता. 18 : माझी वसूंधरा अभियान 5.0 अंतर्गत गोदिया जिल्हा परिषदेला एकूण आठ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ग्रामपंचायत डव्वा, ग्रामपंचायत भजिपार यांनी राज्यस्तरावर दूसरा तर ग्रामपंचायत नानव्हा आणि सिरेगाव यांनी विभागस्तरावर प्रथम पुरस्कार पटविला आहे. विशेष म्हणजे, विभागस्तरीय सर्वोत्कृष्ठ कार्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांना सुध्दा शासनाने सर्वोत्कृष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुरस्कृत केले आहे. मंगळवारी (ता. 17) रोजी महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून माझी वसुंधरा 5.0 अभियानाचे पुरस्कार जाहिर केले आहेत.
माझी वसूधरा 5.0 हे अभियान 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आले. राज्यातील 27895 ग्रामपंचायतींनी या अभियानात भाग घेतला. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबधित पंचतत्वांवर आधारीत हे अभियान असून 2 ऑक्टोबर 2020 पासून या अभियानाला सुरवात करण्यात आली आहे. पंचतत्वावर आधारीत या अभियानांतर्गत डेस्कटॉप आणि फिल्ड मुल्यमापनावर त्रयस्त संस्थेमार्फत गुणांकण करण्यात आले. तीन हजार ते पाच हजार लोकसंख्या गटात डव्वा ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय दुसरे पुरस्कार प्राप्त केले. त्यासाठी 75 लक्ष रुपयांचा पुस्कार शासनाने जाहिर केला आहे. सोबतच भूमि थीमॅटीक मधील उच्चतम कामगीरीसाठी सुध्दा डव्वा ग्रामपंचायतीला पुरस्कृत करण्यात आले असून त्यासाठी शासनाने 50 लक्ष रूपयांचा पुरस्कार जाहिर केला आहे. दीड हजार ते 2 हजार लोकसंख्या गटात भजियापार ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय दुसरे पुरस्कार प्राप्त केले. त्यासाठी 75 लक्ष रुपयांचा पुरस्कार तर भूमि थीमॅटीक मधील उच्चतम कामगीरीसाठी भजियापार ग्रामपंचायतीला 50 लक्ष रूपयांचा पुरस्कार शासनाने जाहिर केला आहे. उल्लेखनीय म्हणजे, दोन्ही ग्रामपंचायतींना दोन वेगवेगळया गटात चार पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांना प्रत्येकी एकूण एक कोटी 25 लक्ष रूपयांचा पुरस्कार मिळणार आहे. दोन हजार ते तीन हजार लोकसंख्या गटात नागपूर विभागातून सालेकसा पंचायत समिती अंतर्गत नानव्हा ग्रामपंचायतीला तर दीड हजार ते दोन हजार लोकसंख्या गटात नागपूर विभागातून अर्जुनी मोरगाव पंचायत समिती अंतर्गत सिरेगाव ग्रामपंचायत प्रथम ठरली असून त्यांना अनुक्रमे प्रत्येकी 50 लक्ष रूपयांचे पुरस्कार जाहीर झालेले आहेत. विशेष म्हणजे, गोंदिया जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींना विविध गटात एकूण सहा पुरस्कार प्राप्त झाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, शासनाने विभागस्तरीय सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील पुरस्कृत केले आहे. यात विभागस्तरातून गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. एम. मुरूगानंथम यांना विभागस्तरीय सर्वोत्तम कामगीरीसाठी पुरस्कृत करण्यात आले. तर जिल्हयात सर्वोत्तम कामगीरीसाठी सालेकसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय पूरी यांना सुध्दा पुरस्कृत करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे, माझी वसुंधरा अभियानात आतापर्यंत गोंदिया जिल्हयात पहिल्यांदा ग्रामपंचायतस्तरावर एकूण सहा आणि वैयक्तीक कार्यासाठी दोन असे एकूण आठ पुरस्कार मिळाले. त्यामुळे गोंदिया जिल्हा परिषदेच्या नावलौकीक वाढला असून ग्रामपंचायतींना पुरस्कर मिळविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. एम. मुरूगनंथम यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. मधूकर वासनिक यांच्या कार्याची देखील सर्वच स्तरातून प्रशंसा करण्यात येत आहे. माझी वसुंधरा अभियानाप्रमाणेच मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानात देखील जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी उत्कृष्ठ कार्य करण्याचे आवाहन करून सर्व पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनीक यांनी अभिनंदन केले आहे.
——
सर्वोत्कृष्ठ मुकाअ
गोंदिया जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर एम. मुरूगानंथम रूजू झाल्यानंतर त्यांनी जिल्हयात अमुलाग्र बदल केला. माहिती व तंत्रज्ञानावर भर देत त्यांनी ई-ऑफिस प्रणालिला सुरवात केली. वर्षानुवर्षापासून रखलेली शिक्षकांची पदोन्नती, अनुकंपा तत्वावरील भरती, जिल्हा परिषदेतील सौंदर्यीकरण, विविध कक्षांची निर्मीती, अनेक कोर्ट प्रकरणे त्यांनी निकाली काढले, मामा तलाव पूर्नरूज्जीवन करणे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंर्गत रस्त्याच्या दुर्तफा हजार किलोमिटरच्या वृक्षारोपण करण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी राबविला, जिल्हा परिषदेत आणि ग्रामपंचातस्तरावर देखील स्वच्छता अभियान राबविण्यावर त्यांनी सर्वाधिक भर दिला आहे. घरकुल निर्माण कार्य तत्परतेने व्हावे, लाभार्थ्यांना योग्य वेळी लाभ मिळावा यासाठी त्यांनी घरकुल लाभार्थ्यांकडे गृहभेटी करून पाहणी केली. ग्रामपंचायतींना थेट-भेट, दप्तर तपासणी, विशेष म्हणजे सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचे विविध अभियानासाठी मनोबल वाढविण्याचे कार्य सुध्दा ते करीत आहेत. सर्वासामान्य व्यक्तींमध्ये मिसळून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देणे, त्यांच्या अडचणी त्वरेने सोडविणे, जनकल्याण आणि लोकोपयोगी कार्य करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मा. एम. मुरूगानंथम यांनी सर्वाधिक भर दिला आहे. कार्यालयीन कार्य अधिक जलद व्हावे, यासाठी कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी प्रशिक्षण घेवून कर्मचाऱ्यांना मध्ये शिस्त निर्माण केली आहे.
——








