गोंदिया(अनिल मुनीश्वर):——————-छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून ते प्रत्येकाने आपल्या जीवनात आत्मसात करावेत, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे तालुका सचिव इंजि.आनंद चंद्रिकापुरे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गोरेगाव तालुक्यातील तुमसर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी, न्यायनिष्ठा आणि सर्वधर्मसमभाव या गुणांचा विशेष उल्लेख केला. “महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना रयतेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. स्त्रियांचा सन्मान, शिस्तबद्ध प्रशासन आणि जनतेशी असलेले नाते ही त्यांची कार्यपद्धती आजही अनुकरणीय आहे,” असे ते म्हणाले.
इंजी. चंद्रिकापुरे यांनी पुढे सांगितले की, शिवाजी महाराजांचे विचार केवळ इतिहासापुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या दैनंदिन आचरणात आणणे गरजेचे आहे. समाजात एकोपा, राष्ट्रनिष्ठा आणि प्रामाणिकपणा वाढवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षस्थानी डॉक्टर लक्ष्मण भगत अर्थ बांधकाम सभापती जिल्हा परिषद गोंदिया उद्घाटक मनोज बोपचे माजी पंचायत समिती सभापती गोरेगाव, उपसभापती रामेश्वर जी महारवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य खु्मेंद्र भाऊ मेंढे, एडवोकेट कृष्णा पारधी, सरपंच योगिता ताई देशमुख तसेच
कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी ‘जय शिवराय’च्या घोषणांनी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.









