गोंदिया(अनिल मुनीश्वर):—-, दि. १५ ऑगस्ट – भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली, गोंदिया येथील पक्ष कार्यालयात ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पालकमंत्री मा. श्री. इंद्रनील नाईक जी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. खासदार श्री. राजेंद्रजी जैन होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष श्री. प्रेमकुमार रहांगडाले, महिला जिल्हाध्यक्षा सौ. राजलक्ष्मी तूरकर आणि युवक जिल्हाध्यक्ष श्री. केतन तूरकर उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या थोर महात्मे, स्वातंत्र्यसैनिक आणि सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या शूरवीर जवानांना आदरपूर्वक अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.









