स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ तातडीने कार्यान्वित करा,तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेची मागणी,निवेदन सादर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडकअर्जुनी(निखिल अनिल मुनीश्वर):——————————————— दिनांक ६/४/२६/

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ तातडीने कार्यान्वित करण्यात यावा अश्या आसयाचे निवेदन सडक अर्जुनी तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटना यांच्यावतीने तहसीलदार सडक अर्जुनी यांच्यामार्फत राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने देण्यात आले
महाराष्ट्र शासनाने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय दिनांक 10 ऑक्टोंबर 2024 ला घेण्यात आला होता या निर्णयामुळे राज्यातील हजारो कष्टकरी वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये फाशीचा किरण निर्माण झाला होता मात्र आता चौदा महिने लोटूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही
दिनांक 11 मार्च 2026 रोजी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार श्रीकांत भारतीय यांनी हा मुद्दा उपस्थित केला असता माहिती व जनसंपर्क मंत्री नामदार एडवोकेट आशिष शेलार यांनी पुढील अधिवेशनापूर्वी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन दिले आहे
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना गेल्या पंधरा वर्षापासून राज्यातील कष्टकरी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हक्कासाठी सातत्याने लढा देत आहे वृत्तपत्र विक्रेता हे लोकशाही व्यवस्थेतील माहितीचा प्रवाह जनतेपर्यंत पोहोचविणारे अत्यंत महत्त्वाचे ध्येय आहे प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असतानाही हा घटक असंघटित कामगार म्हणून आजही सामाजिक सुरक्षा विमा निवृत्तीवेतन किंवा अन्य कल्याणकारी योजना पासून वंचित आहे म्हणून मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ कार्यविणीत करण्यात यावा यासाठी शासनाने तात्काळ जीआर काढावा अशी मागणी करण्यात आली आहे
सडकअर्जुनी येथील तहसीलदार आनंद जाधव यांना निवेदन सादर करतेवेळी तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगदीश शाहारे,उपाध्यक्ष मोहनलाल सातभावे,कार्याध्यक्ष राधेश्याम कवरे, सचिव योगेश वालदे,कोसाध्यक्ष बिरेंद्र रहांगडाले सल्लागार साहिद पटेल सदस्य अनिल मुनीश्वर,दिलीप वंजारी,वीरेंद्र वालदे उपस्थित होते

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली