कोहमारा येथे शिवशाही बस ला अपघात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनिश्वर):–

जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात काही महिन्या अगोदर 29 नोव्हेबर 24 रोजी गोंदिया-कोहमारा मार्गावर वृंदावन टोला खजरी फाट्यावर शिवशाही बसला भीषण अपघात झाला. यात 11 जणांचा बळी गेला,18 जण गंभीर तर 12 जण किरकोळ जखमी झाले होते. त्या अपघाताची शाई वाळत नाही तोच आज 22 मार्च रोजी दुपारी 2 च्या सुमारास नागपूर-रायपूर महामार्गावर कोहमारा चौकात रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणार्‍या भरधाव ट्रकने गोंदियावरून नागपूरकडे जाणार्‍या शिवशाही बस क्रमांक एमएच 06 बीडब्ल्यू 0143 ला धडक दिली. सुदैवाने दुदैवी घटना घडली नाही, बसमध्ये 19 प्रवासी होते. चालक किरकोळ जखमी झाला. सुदैवाने प्रवासी सुरक्षित आहेत. अपघातात मात्र बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस व एसटीचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी ट्रकचालकाने ट्रकसह पोबारा केला…

मोठा अनर्थ टळला…

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल