पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
(शिवरामटोला नजीक जंगलातील घटना)

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनिश्वर):–

जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्र कार्यालय आणि वनविकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या शिवरामटोला नाजिक सकाळच्या सुमारास मोहफुले संकलन करीत असलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज (दि.२३)रोजी घडली आहे.वाघाच्या हल्यात मृत झालेल्या महिलेचे नाव अनुसया धानु कोल्हे (वय अंदाजे ५०) रा. शिवरामटोला असे आहे.
घटना स्थळावरील माहितीनुसार मृतक महिला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान गावानजीक असलेल्या वन विकास महामंडळाच्या ( कक्ष क्र.३३२) जंगल परिसरात मोहफुले संकलन करीत असताना दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने महिलेच्या पाठीमागून हल्ला करून तिला अंदाजे १०० मीटर अंतरावर फरफटत नेले. व जवळच असलेल्या पहाडीच्या पायथ्याशी मृत महिलेच्या जवळ तीन तासापर्यंत तळ मांडून बसला असल्याची माहिती आहे. घटनेची माहीती मिळताच गावातील नागरिक मोठ्या संख्येने घटना स्थळी आले. त्यामुळे लोकांना अगदी जवळून वाघाचे दर्शन घेता आले.घटनेची माहिती मिळताच गोठणगाव वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी,आणि वनविकास महामंडळाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले .या घटनेमुळे शिवरामटोला गावात शोक कळा पसरली असून नागरिकांनी जंगलात एकटे न जाण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
घटना वनविकास महामंडळ हद्दितील असल्याने पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.बातमी लीहीपर्यंत वनविभाग आणि वनविकास महामंडळाने काय कार्यवाही केली ही माहिती मिळू शकली नाही.
घटनेची माहीती या विभागाचे आमदार राजकुमार बडोले यांना सकाळीच प्राप्त झाली.लगेच त्यांनी वनविभाच्या वरिष्ठ अधिका-यांना भ्रमणध्वनीवरुन माहीती देवुन तातडीने घटनास्थळी जावुन चौकशी करुन वाघाचा बंदोबस्त करण्याच्या सुचना दिल्या.व मृतक महिलेच्या कुटुंबियांना तातडीने मदत व मोबदला देण्याचे सुचना करुन मृत महिलेच्या कुटुंबा विषयी शोक प्रकट केला.

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली