खडकी ग्रामपंचायत उपसरपंच पदी ओमराज दखणे विराजमान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(अनिल मुनिश्वर):–

तालुक्यातील खडकी/डोंगरगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदाकरिता 28 मार्च 2025 ला सरपंच शर्मिलाताई मधुकर चिमणकर यांच्या अध्यक्षतेत  निवडणूक घेण्यात आली यावेळी उपसरपंच पदाकरिता चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले यावेळी पुरुषोत्तम मेश्राम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने होमराज दखणे,सुभाष कुडमते व कौतुका कुंभरे यांचे अर्ज निवडणुकीत असल्याने निवडणूक चुरशीची झाली,ओमराज दखणे यांना 4 मते कौतुका कुंभरे यांना 4 मते सुभाष कुडमते यांना शून्य मते मिळाल्याने ओमराज दखणे व कौतुका कुंभरे यांच्यात चूरस होऊन समान मते मिळाल्याने सरपंच शर्मिलाताई चिमणकर यांचे मत निर्णायक असल्याने ओमराज दखणे यांच्या बाजूने पडल्याने ओमराज दखणे यांचा विजय झाला व ते उपसरपंच पदावर विराजमान झाल्याचे जाहीर करण्यात आले निवडणूक निरीक्षण अधिकारी म्हणून नायब तहसीलदार त्र्यंबक गुडदे,जगदीश जांभुळकर व ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र पदा यांनी काम सांभाळले.निवडणूक शांततेत पार पडली…
🌹💐 ग्रामपंचायत खडकी/डोंगरगाव उपसरपंच पदी ओमराज दखणे यांची निवड झाल्यामुळे सरपंच शर्मिलाताई चिमणकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे…

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल