मामा भांजे यात्रेत
सिकल सेल जनजागृती
*********************
गोंदिया(अनिल मुनीश्वर):————-(2जानेवारी 26)
पूर्व विदर्भात सुप्रसिद्ध असलेल्या विदर्भ आणि छत्तीसगड सीमेवर
नव वर्षाच्या नव पर्वावर
नवसाच्या मामा भांजे यात्रेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रणित पाटील यांच्या नेतृत्वाखाली
सिकल सेल जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते.
विशेष म्हणजे या सिकल मुक्त गोंदिया अभियानाच्या स्टॉल ला सडकअर्जुनी चे लोकप्रिय आमदार महोदय श्री राजकुमार बडोले यांनी देखील भेट देऊन सिकल जनजागृती चा संदेश दिला.
गोंदिया जिल्ह्यात नागझिरा
अभयारण्यात घनदाट जंगलात वसलेल्या गिरोला
या आदिवासी पाड्याजवळ दोन उंच उंच
टेंभुर्णी च्या झाडा जवळ
मामा भांजे ही यात्रा
वृक्ष संवर्धन आणि आरोग्य संवर्धनाचा दरवर्षी संदेश देते हजारोच्या संख्येने
महाराष्ट्र आणि छत्तीसगड येथून लोक नवस फेडण्यासाठी येतात
तालुका आरोग्य विभागा तर्फे सुद्धा यात्रेत सहभागी लोकांना आरोग्य विभागाचे
विविध योजनाचा लाभ मिळावा या हेतूने विविध स्टॉल्स च्या माध्यमातून
जनजागृती केली जाते.
गोंदिया जिल्ह्यात सिकल मुक्त गोंदियाचा संकल्प अभियान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिजित गोल्हार आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम पटले यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून या मामा भांजे यात्रेत देखील जिल्हा आय इ सी ब्युरो प्रमुख श्री विजय आखाडे यांच्या
पुढाकाराने या कॅम्प मधे सिकल सेल उच्चाटन बाबत सखोल माहिती
डॉ सुवर्णा हुबेकर डॉ सोनल मेश्राम डॉ बिसेन आणि डॉ राठोड डॉ मानकर यांनी सविस्तर सांगितले तसेच
यात्रेत लोकांना सिकल सेल जनजागृती बाबत माहिती पत्रिका वाटप करण्यात आले.
खोड शिवानी आरोग्य केंद्र
चे सर्व पॅरामेडिकल स्टाफ यांनी कॅम्प साठी परिश्रम घेतले.या टीम मध्ये
वाय. एस. उंदिरवाडे
पी. डी. गहाणे
कु. आशा जैतवार
रेणुका लांजे
वर्षा पंचभाई
हिरकन्या तेंभरे
शालिनी वैद्य प्रामुख्याने
उपस्थित होते.








