सडकअर्जुनी:-
♥तालुक्यातील दि सहकारी भात गिरणी मर्या.सौंदड या संस्थेची ३१ मे २०२६ रोजी निवडणूक घेण्यात आली.या निवडणुकीत सहकार पॅनलने एकहाती सत्ता काबीज करून विजय संपादन केले.यात सहकार पॅनलचे १३ संचालक निवडून आले तर परिवर्तन पॅनलचे २ संचालक निवडून आले.२१ जून २०२६ रोजी निवडणूक अधिकारी निलेश जिभकाटे सहकार अधिकारी यांचे उपस्थितीत संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवडणूक घेण्यात आली. दुपारी १ वाजे संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष पदाकरीता रमेश चु-हे व उपाध्यक्ष पदाकरीता नोकराम येळे यांनी अर्ज दाखल केले.अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता एक एकच उमेदवारी अर्ज असल्याने निवडणूक अधिकारी यांनी दोन्ही उमेदवारांना अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी अविरोध निर्वाचित झाल्याचे घोषित केले.या निवडणूकीत सहकार पॅनलचे नेतृत्व सहकार नेते गंगाधर परशुरामकर, डॉ.अविनाश काशिवार व रमेश चु-हे यांनी केले.यावेळी भागवत कापगते,भामा चु-हे,प्रकाश इरले,मोरेश्वर चांदेवार, सोमेश्वर पटले,सुखदेव कोरे, गोविंदा पंधरे,मनोहर निर्वाण, इक्बाल शेख,भूमेश्वर शिवनकर, राधेश्याम कांबळे,मंगेश चु-हे, श्रीमती स्मिताताई बोधनकर व सहकार पॅनलचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.नवनिर्वाचित अध्यक्ष रमेश चु-हे व उपाध्यक्ष नोकराम येळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.










