
देवरी(निखिल मुनीश्वर):———————————————————————————
महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत (DTE Maharashtra) शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका (Diploma) तसेच थेट द्वितीय वर्ष पदविका प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित ऑनलाईन नोंदणी करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, देवरी चे प्राचार्य मुकेश एम. तरोणे यांनी केले आहे.
प्राचार्य तरोणे यांनी सांगितले की, प्रथम वर्ष पदविका प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणीची सुरुवात 20 मे 2026 पासून झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै 2026 आहे. तसेच बारावी विज्ञान (PCM) उत्तीर्ण तसेच संबंधित शाखेतील आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी थेट द्वितीय वर्ष पदविका प्रवेशाची नोंदणी 23 जून 2026 पासून सुरू झाली असून अंतिम तारीख 6 जुलै 2026 आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करून आपल्या प्रवेशाची खात्री करावी.
आजच्या आधुनिक व तंत्रज्ञानाधारित युगात अभियांत्रिकी पदविका शिक्षणाला मोठी मागणी असून उद्योगक्षेत्र, सरकारी सेवा, स्वयंरोजगार तसेच उच्च शिक्षणासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रथम वर्ष पदविका प्रवेश, तर बारावी विज्ञान (PCM) व आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी थेट द्वितीय वर्षात प्रवेशाची विशेष सुविधा उपलब्ध आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा एक वर्षाचा कालावधी वाचून त्यांना करिअरमध्ये अधिक वेगाने प्रगती करता येते.
सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, देवरी येथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखांमध्ये प्रवेश उपलब्ध असून संस्थेत अनुभवी प्राध्यापकवर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, आधुनिक शैक्षणिक सुविधा, व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम, उद्योगभेटी, तांत्रिक प्रशिक्षण व कॅम्पस प्लेसमेंटच्या उत्कृष्ट सुविधा उपलब्ध आहेत.
यावर्षी विविध नामांकित उद्योगसंस्थांच्या कॅम्पस प्लेसमेंट उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपल्या करिअरला योग्य दिशा द्यावी, असेही प्राचार्यांनी नमूद केले.
“तांत्रिक शिक्षण हे उज्ज्वल भविष्यासाठी सर्वात प्रभावी माध्यम आहे. दहावी, बारावी विज्ञान व आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन नोंदणी करून आपल्या यशस्वी करिअरची पायाभरणी करावी,” असे आवाहन प्राचार्य श्री. मुकेश एम. तरोणे यांनी केले.










