सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):————
इंधन जगतातील नवरत्न कंपनी इंडियन ऑइल तर्फे आज दिनांक नऊ जानेवारीला ग्राहक दिन आराध्या पेट्रोलियम नैनपुर/डूगीपार या पेट्रोल पंपावर साजरा करण्यात आला.
यावेळी इंडियन ऑइल चे सेल्स ऑफिसर मोहित सोलानी यांनी केक कापून ग्राहक दिनाचे उद्घाटन केले तसेच उपस्थित सर्व ग्राहकांना भेटवस्तू दिल्या यावेळी पंप मालक डॉ.गजानन डोंगरवार,सदानंद डोंगरवार,व्यवस्थापक राजेंद्र गहाणे, ऑपरेटर पप्पू मस्के,प्रशांत गावड,चंदू कापगते,निकिता डोये,भूमिता कापगते,व ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी सेल्स मॅनेजर यांनी समाधान व्यक्त करताना सर्वांना ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या








