नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये पक्षीमित्र व नागरिकांसाठी पक्षी गणना करण्याची संधी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनीश्वर):———– —–
विदर्भातील गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील प्रदेशाला तलावाचा प्रदेश म्हणून ओळखले जाते या दोन्ही जिल्ह्यातील तलावांवर परदेशी जल पक्ष्यांचे हिवाळ्यात आगमन होत असते म्हणून गोंदिया भंडारा जिल्ह्यातील 24 तलावावर रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी सहा ते नऊ वाजता किमान 65 पक्षी निरीक्षक आणि गोंदिया-भंडारा वनविभाग व नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया वनाधिकारी,वन कर्मचारी यांचे मार्फत 40 वी आशियाई जलपक्षी गणना 2026 करण्यात येणार आहे
एशियाई जलपक्षी गणना AWC जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त दीर्घकालीन जैवविविधता देखरेख कार्यक्रम आहे जो दरवर्षी हिवाळा या ऋतूमध्ये केला जातो,AWC – 2026 साठी शिफारस केलेल्या कालावधी दिनांक 30 जानेवारी ते 18 जानेवारी 2026 असा आहे भारतात ही गणना आंतरराष्ट्रीय जलपक्षी गणनेचा एक भाग आहे व बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी ऑफ वेट लँड इंटरनॅशनल साउथ एशिया यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्य वन विभागाच्या सक्रिय सहभागाने केली जाते तरी या संधीच्या लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पक्षीमित्र व अन्य नागरिकांनी सहभाग नोंदवावा आपला सहभाग नोंदविण्यासाठी नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया यांचे www.navegaonnagzira.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन उपसंचालक,प्रीतम सिंग कोडापे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प साकोली यांनी केले आहे…

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली