सडकअर्जुनी(अनिल मुनीश्वर):—————-
शालेय वयातच शेतीला व्यवसाय म्हणून पाहण्याची प्रवृत्ती विकसित करण्याच्या व विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कृषी प्रक्रिया आणि विपणनाची माहिती मिळावी या उद्देशाने.पुढील काळात शेतीक्षेत्रात येणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे, यासाठी शेती क्षेत्राकडे उद्योगक्षेत्र म्हणून पहावे लागेल. हे लक्षात घेऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारताच्या कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक (फाली) हा उपक्रम भविष्यात शेती क्षेत्रात नवीन आणि तरुण उद्योजक तयार करण्यासाठी पायाभरणी करत आहे.
“फाली” या संस्थेद्वारे आयोजित कृषी व्यवसाय नियोजन स्पर्धेमध्ये तालुक्यातील पाटेकुर्रा येथील सचिन हायस्कूल मधील आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांनी शेती व शेती संबंधित उद्योगांची सर्व माहिती मिळवत,त्यासाठी आवश्यक भांडवल (वित्तपुरवठा), जमीन, उत्पादनासाठी नियोजन व त्याची अंमलबजावणी,उत्पादित केलेल्या मालासाठी बाजारपेठ, वाहतूक व्यवस्था, साठवणूक क्षमता, उत्पादक -विक्रेता- ग्राहक याची माहिती, विक्री किंमत, किमान फायदा, व्यवसायात असलेली स्पर्धा, जाहिरात, स्पर्धक व गुणवत्ता याचा विचार करून नवनवीन उद्योगांच्या संकल्पना मांडल्या व त्यांचे व्यवसाय नियोजन सादर केले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेती क्षेत्राविषयीची आणि शेती आधारित व्यवसायाची आवड निर्माण झाली आहे.
या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी कृषी वर आधारीत वेगवेगळ्या प्रकारचे कृषी व्यवसाय तयार करून आणले होते यामधे टोमॅटो सॉस, कोरफड पासून साबण, पपई रस बाटलीबंद पॅकमध्ये, मशरूम उत्पादन, शेवगा पाउडर, पपईपासून चेरी उत्पादन, नीम पेस्ट गर्द, नारळा पासून तेल, धूप, गुलाबाच्या पाकळ्यांपासून सुगंधी अत्तर ,तांदळापासून विविध खाद्यपदार्थ,माती विना शेती (हायड्रोपोनिक्स),कुक्कुटपालन, शेळीपालन, मधुमक्षिका पालन या व्यवसाय प्रकल्पाचा समावेश होता.विद्यार्थ्यांच्या गटाला प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
परीक्षक म्हणून एच एस खंडाते,वाय के चव्हाण मॅडम यांनी मोलाची भूमिका पार पाडली.स्पर्धेच्या आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य डाकराम एल मेश्राम,बी एन ठाकरे,जी बी डोंगरवार,आर पंधरे मॅडम,के टी तुरकर मॅडम, जी आर रहांगडाले यांचे सहकार्य लाभले.
या स्पर्धेचे आयोजन फाली या संस्थेचे सहाय्यक व्यवस्थापक व विदर्भ पर्यवेक्षक प्रदीप गरकळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली फाली कृषी विषय शिक्षक स्वप्निल रांधवन यांनी केले.








