सडकअर्जुनी(अनिल मुनीश्वर)
सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असून रात्रीच्या वेळी रेती तस्कर सक्रिय होऊन मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करीत आहेत त्यापैकी तालुक्यातील पिपरी घाट परिसरातून वाळूचा अवैध उपसा करून वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर सडकअर्जुनी तहसीलदारांच्या पथकाने केलेल्या कारवाईत दोघांच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक एम एच 36 ए एल 54 56 व एम एच 36 ए एल 59 62 या क्रमांकाचे दोन ब्रास रेती भरलेले हीवराज रामदास लोथे व सुहास जसवंत चांदेवार दोन्ही राहणार गोंडुमरी जिल्हा भंडारा यांच्यावर महसूल नियमानुसार कारवाई करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. ही कारवाई दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रात्री अकरा वाजून 30 मिनिटां सुमारास करण्यात आली तहसीलदार अनंत जाधव यांच्या पथकाने धडक कारवाई केल्याने परिसरातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे पुढील तपास तहसीलदार अनंत जाधव करीत आहेत









