सडकअर्जुनी(निखिल मुनीश्वर): (२२ मार्च)
रमजान ईदच्या पावन निमित्ताने आमदार राजकुमार बडोले यांनी आपल्या मतदारसंघातील मुस्लिम बांधवांना प्रत्यक्ष भेट देत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. केवळ औपचारिक शुभेच्छांपुरते मर्यादित न राहता त्यांनी स्वतः उपस्थित राहून सणाचा आनंद सामायिक केला.
या भेटीदरम्यान आमदार बडोले यांनी पेढे भरवून सणाचा आनंद साजरा केला आणि उपस्थित नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांनी प्रत्येकाशी आत्मीयतेने संवाद साधत बंधुभाव, एकता आणि सौहार्द यांचा संदेश दिला. सर्व धर्म आणि समाज एकत्र येऊन सण साजरे करणे हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे असे प्रतिपादन त यावेळी केले.
विशेष म्हणजे, आमदार बडोले यांनी मुस्लिम समाजाच्या पारंपरिक शीर खुरमाचा आस्वाद घेत आनंदात सहभागी होत सर्वांसोबत मनोमिलन साधले. उपस्थित प्रत्येकाला प्रेमपूर्वक आलिंगन देत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी गोरेगाव पंचायत समिती सभापती चित्रलेखा चौधरी, पंचायत समिती सडक अर्जुनीचे सभापती चेतन वडगाये, माजी सभापती मनोज बोपचे, उपसभापती रामेश्वर मारवाडे, माजी उपसभापती शालिंदर कापगते, भाजपा महामंत्री प्रशांत शहारे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ललित डोंगरवार, पराग कापगते, संजय खरवडे तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.









