गोंदिया(अनिल मुनीश्वर):================================================================
*यशस्वी सापळा कार्यवाही अहवाल*
➡️1. *ला.प्र. घटक* – गोंदिया
➡️2. *तक्रारदार* – वय 42 वर्षे/पुरुष,
➡️3. *फिर्यादी* – सरकारतर्फे अरविंद राऊत , पोलीस निरीक्षक, लाप्रवी. गोंदिया
➡️4. *आरोपी*- श्रीमती गायत्री बोरकर वय 41 वर्ष पद ग्राम महसूल अधिकारी साजा निमगाव क्र 10 तहसील कार्यालय अर्जुनी मोरगांव तालुका अर्जुनी मोरगांव जिल्हा गोंदिया (वर्ग 3)
➡️5. *तक्रार* – प्रकरण अशा प्रकारे आहे की, तक्रारदार यांचा विटभटीचा व्यसाय असून विटभटी करीता लागणारी माती गावातील विविध शेतकर्यांकडून आनत असतात मागील वर्षी मार्च 2025 मधे गैरअर्जदार तलाठी यानी तक्रारदार याना तुम्ही मातीचा अवैध उत्खन करता असे म्हणुन तक्रारदार यांचे कडून रु .33000/- घेऊन गेल्या त्यांतर पुन्हा या वर्षी दिनांक 12/03/2026 रोजी गैरअर्जदार ग्राम महसूल अधिकारी बोरकर यानी तक्रारदार याना फोन करुण अवैध मातीचे उत्खानावर कारवाही न करने करीता रु . 37000/- द्यावे लागतील असे म्हणून तक्रारदार यांचे कडे लाचेची मागणी करुण रु 10000/- दिनांक 12/03/2026 रोजी स्वीकारून उर्वरित 27000/- नंतर असे म्हणुन तक्रारदार यांचे कडून लाच रकमेची मागणी केली आहे तक्रारदार यांना ती लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक 23.03.2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे फोन करून तक्रार सांगितली होती त्यावरून अर्जुनी मोरगाव येथे येऊन आलोसे यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली होती.
➡️6. *पडताळणी* – सदर तक्रारीवरून दिनांक 23. 03.2026 रोजी सापळा अधिकारी यांनी दोन पंचासह अर्जुनी मोरगांव येथे जाऊन तक्रारदार यांना पंचासह आलोसे यांचेकडे पाठवून लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता, आलोसे यांनी तक्रारदार यांचेवेर मातीचे अवैध उत्खनना वर कारवाही न करने करीता तडजोडी अंती एकूण 35000 रु . रुपयांची मागणी करून त्यापैकी 10000/- रुपये दिनांक 12.03.2026रोजी स्वीकारल्याचे मान्य करून 23/03/2026 रोजी 10000रु . स्वीकारण्याचे मान्य करून व उर्वरित 15000/- रु दिनांक 24/03/2026 रोजी स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे.
➡️7. *सापळा* – दिनांक 23.03. 2026 रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून तक्रारदार यांचेवर अवैध मातीचे उत्खानावर कारवाही न करने करीता तक्रारदार यांचे कडून 10000/ रुपये लाच रक्कम स्वीकारून गैरफायदा घेतला आहे.
➡️8. *आरोपीची अंगझडती* – आरोपीच्या अंगझडतीत लाच रकम 10000 /रुपये मिळून आले आहेत.
➡️9. **मोबाईल जप्ती* -*आरोपी यांच्या ताब्यात Realme कंपनीचा किमती 3000 रु. चा 1 मोबाईल,ताब्यात घेण्यात आला आहे.
➡️10. *आरोपीची घरझडती* – आरोपीची घर झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
➡️11. *गुन्हा* रजिस्टर न, कलम पोस्टे. अर्जुनी मोरगांव जिल्हा गोंदिया येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
➡️12. *गुन्हा नोंद दिनांक वेळ* – गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
➡️13. *आरोपी अटक दिनांक व वेळ* – महिला आरोपी असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिनांक 24 मार्च 2026 सकाळी सात वाजता पोलीस स्टेशन अर्जुनी मोरगाव येथे हजर राहणेबाबत सूचना पत्र देऊन आरोपीचे पतीचे ताब्यात देण्यात आले आहे…
➡️14. *सापळा अधिकारी* – अरविंद राऊत, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वी. गोंदिया
➡️15. *पर्यवेक्षण अधिकारी -* उमाकांत उगले, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वी. गोंदिया
➡️16. *तपास अधिकारी* – श्री उमाकांत उगले पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया
➡️ *कारवाई पथक-* ACB गोंदिया पथक
➡️ *मार्गदर्शन* :
1) *मा.डॉ.श्री दिगंबर प्रधान* *पोलीस अधीक्षक*
ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र, नागपूर,
2 *)मा.श्रीमती माधुरी बाविस्कर*,अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर
3) *मा.श्री.विजय माहुलकर* अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि, नागपूर
👉🏻 गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी स्वतः किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास तात्काळ खालील ठिकाणी संपर्क साधावा.
अँटी करप्शन ब्युरो टोल फ्री क्रमांक १०६४









