लोहिया विद्यालयात प्रतिमांचे अनावरण संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

*लोहिया विद्यालयात प्रतिमांचे अनावरण संपन्न*
सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):—————तालुक्यातील सौंदड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक उच्च माध्यमिक (कला व विज्ञान शाखा ),रामदेवबाबा अध्यापक विद्यालय ,जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा तसेच लोहिया कॉन्व्हेंट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 29 डिसेंबर 2025 रोज सोमवारला सकाळी 9.30 वाजता पंडित मा.श्रीकृष्णजी मुळे तसेच त्यांचे सहकार्यांद्वारे रुद्राभिषेक पूजन कार्यक्रम संपन्न झाला .त्यानंतर स्वर्गीय जमुनादेवी,स्व. रामेश्वरदासजी तसेच स्व. जमनादासजी लोहिया यांच्या अर्धकृती प्रतिमांचे अनावरण सत्कारमूर्ती मा. पूर्वा अग्रवाल( IAS) यांच्या शुभहस्ते मा. सितारामजी अग्रवाल अध्यक्ष ,श्री महावीर मारवाडी स्कूल सोसायटी, गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली तसेच लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक- संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया, सचिव मा. पंकज लोहिया, कोषाध्यक्ष मा. सुरेशकुमार लोहिया मा. प्रभुदयाल लोहिया माजी सदस्य जि.प. भंडारा, लोहिया शिक्षण संस्थेचे सदस्य मा.कन्हैयालाल लोहिया ,मा. पुरुषोत्तम लोहिया ,मा. दीपक लोहिया यांच्या प्रमुख आतिथ्याखाली, लोहिया शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. आनंदराव घाटबांधे , सहसचिव मा. मधुसूदन अग्रवाल, प्राचार्य मा. उमा बाच्छल, मा .गुलाबचंद चिखलोंढे, मुख्याध्यापक मा.मनोज शिंदे, पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे, प्राध्यापक आर. एन.अग्रवाल
यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.तसेच
यावेळी सर्व मान्यवरांनी प्रतिमेच्या स्वरूपातील भारत माता, भगवान गणेशजी ,हनुमानजी , अग्रेसेनजी, रामदेवबाबा यांचे पूजन, माल्यार्पण करुन दीप प्रज्वलन केले.
लोहिया शिक्षण संस्थेद्वारे मा. पूर्वा अग्रवाल (आय.ए.एस) ,मा.डॉ.प्राची विनोद कुमार अग्रवाल एम.बी.बी.एस एम.डी (रेडिओलॉजी), मा. सुहानी विजय अग्रवाल यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन मा. जगदीश लोहिया यांनी त्यांचा सत्कार केला.तसेच वर्ग दहावी व बारावी मध्ये गुणानुक्रमे प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा अतिथींच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या मा.उमा बाच्छल यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी बोधपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सिताराम अग्रवाल यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की प्रत्येक मनुष्य हा आपल्या भाग्याचा कारागीर असतो. तसेच मा. पूर्वा अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना सांगितल की 3 D म्हणजे दृढ निश्चय , कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन मनुष्याला यशाच्या शिखरावर पोहोचवते . मा. डॉ. प्राची अग्रवाल यांनी म्हटले की जीवनात योग्य दिशा ठरवून त्या दिशेने वाटचाल करावी . मा. अनिता मोहन अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना म्हटले की चांगले यश संपादन करायचे असेल तर वर्गात लक्ष केंद्रित करून शिकावे . मा.जगदीश लोहिया यांनी म्हटले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी लोहिया परिवाराने लोहिया शिक्षण संस्थेची उभारणी केलेली आहे .कार्यक्रमाला लोहिया शिक्षण संस्थेच्या विविध कार्यकारणीचे पदाधिकारी व सदस्यगण ,लोहिया परिवारातील सदस्यगण तसेच नातेवाईक गावातील व बाहेरून आलेले समाजबांधव, निमंत्रित पाहुणे विद्यालयातील शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन यु.बी डोये यांनी केले तर आभार प्राचार्य गुलाबचंद चिखलोंडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता” वंदे मातरम “या गीताने करण्यात आली.

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली