गोंदिया(अनिल मुनीश्वर):——————–, आदिवासी जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. कचारगड येथे आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थळ असून विविध राज्यातुन भाविक मोठ्या संख्येने कचारगड येथे येतात. यावर्षीची यात्रा दि.30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत आहे. या पाच दिवशीय यात्रेत भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आज कचारगड येथे प्रत्यक्ष पाहणी करून सर्व संबंधित विभागांना जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी निर्देश दिले.
कचारगड येथील सगा मांदी ठिया सभागृहात आज (ता.13 जानेवारी) जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली यात्रेसंदर्भात आढावा घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी एम.मुरुगानंथम,पोलीस अधीक्षक गोरख भामरे,निवासी उपजिल्हाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सभेला उपविभागीय अधिकारी देवरी कविता गायकवाड, प्रकल्प अधिकारी उमेश काशिद,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) मधुकर वासनिक,पोलीस उपअधीक्षक प्रमोद मडामे,सहायक वनसंरक्षक सचिन मुरलीधर डोंगरवार, सार्वजनिक बांधकाम क्र.2 कार्यकारी अभियंता एस.डी. उसेंडी, नगरपंचायत मुख्याधिकारी करिश्मा वैद्य, नायब तहसिलदार अमृता सुतार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, कोसमतर्रा ग्रामपंचायत सरपंच सिंधू घरत व कचारगड देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.
0000000








