खासदार राजेंद्र जैन यांचा देवरीत सकल दिगंबर जैन समाजाच्या तसेच देवरी तालुका राईस मिलर्स असोसिएशनच्या वतीने भव्य सत्कार
गोंदिया(अनिल मुनीश्वर):-
खासदार पदी निवड झाल्यानंतर प्रथमच देवरी येथे आगमन झालेल्या खासदार श्री. राजेंद्र जैन यांचे सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करून भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार श्री राजेंद्र जैन यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार राजेंद्र जैन यांनी सत्काराबद्दल सकल दिगंबर जैन समाजाचे मनःपूर्वक आभार मानले. समाजाने माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि दिलेले प्रेम ही माझ्यासाठी मोठी ऊर्जा आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तसेच गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी समाजाच्या प्रगतीसाठी आणि सर्व समाजघटकांच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.
सत्कार समारंभाला सर्वश्री नरेंद्र जैन, अशोक अजमेरा, नरेश अजमेरा, प्रेमकुमार रहांगडाले, गिरीश पाटनी, विनोद छाबडा, रमेश ताराम , योगेश पाटनी, गिरीश जैन, भरत जैन, केतन तूरकर, अर्पितजैन, अनिल म्हैसकर, कैलास अग्रवाल, गोपाल तिवारी, बगडियाजी, देशमुख जी समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार राजेंद्र जैन यांचा सत्कार
देवरी तालुका राईस मिलर्स असोसिएशनच्या वतीने देवरी येथे प्रथम आगमनार्थ खासदार श्री राजेंद्र जैन यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी खासदार जैन यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी नरेंद्र जैन, संजू अग्रवाल, मनीष अग्रवाल, अंकित अग्रवाल, प्रेमकुमार रहांगडाले, सुरेश हर्षे, केतन तुरकर, रमेश ताराम, धीरज अग्रवाल, दयेश अग्रवाल, खेमराज देशमुख, प्रकाश बगडिया, सुनील अग्रवाल, कैलास अग्रवाल, हनुमंतप्रसाद अग्रवाल व सचिन अग्रवाल सहित संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.









