Edition

📅
-- --:--:--

शेतकरी-शेतमजूर हक्क परिषदेला आमगावात उद्या उत्स्फूर्त प्रतिसादाची शक्यता जिल्हा मेळावा किसान काँग्रेसतर्फे आयोजन; नाना पटोले यांच्या हस्ते उद्घाटन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकरी-शेतमजूर हक्क परिषदेला आमगावात उद्या उत्स्फूर्त प्रतिसादाची शक्यता

जिल्हा मेळावा किसान काँग्रेसतर्फे आयोजन; नाना पटोले यांच्या हस्ते उद्घाटन•

आमगाव(प्रशांत गायधणे):—-

शेतकरी व शेतमजुरांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करण्याच्या उद्देशाने शेतकरी-शेतमजूर हक्क परिषद तथा जिल्हा मेळावा किसान काँग्रेस, गोंदिया जिल्हा यांच्या वतीने सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता आमगाव येथील साई मंगलम लॉन, सालेकसा रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.

या परिषदेचे उद्घाटन माजी राष्ट्रीय अध्यक्ष किसान काँग्रेस तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. नाना भाऊ पटोले यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष किसान काँग्रेस मा. पराग पाष्टे राहणार आहेत.

परिषदेला काँग्रेस कमिटी गोंदियाचे जिल्हाध्यक्ष अमर वराडे, खासदार डॉ. नामदेवरावजी किसन, खासदार प्रशांतजी पडोळे, माजी आमदार गोपालदासजी अग्रवाल, माजी आमदार दिलीपजी बनसोड, आमदार अभिजितजी वंजारी यांच्यासह काँग्रेस व किसान काँग्रेसचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी शेतकरी व शेतमजुरांच्या विविध समस्या, शेतीशी संबंधित प्रश्न, शेतमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांचे हक्क तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांवर विचारमंथन होण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

परिषदेचे आयोजन जितेंद्र राणे, जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस गोंदिया जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून, जिल्हा व तालुका किसान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यक्रमाची तयारी करण्यात आली आहे.

— AGMNEWS24 | मुख्य संपादक अनिल मुनीश्वर

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

error: Content is protected !!